लेक शेततळ्यात पडला, वडिलांनी पोहता येत नसतानाही मुलाला वाचवलं; पण स्वत: बाहेर येऊ शकले नाही, कुटुंबावर शोककळा.

शेततळ्यात काम करताना लेक पाण्यात पडला, वडिलांना पोहता येत नसतानाही त्यांनी मुलाला वाचवलं. पण ते स्वत:ला पोहता येत नसल्याने वाचवू शकले नाहीत.शेततळ्यातून पाईप काढताना मुलगा पाय घसरून शेततळ्यात पडला. लेकाला वाचवण्यासाठी पोहता येत नसताना देखील वडिलांनी शेततळ्यात उडी मारली. अथक प्रयत्नांनी त्यांनी मुलाला वाचवलं. मात्र मुलाला वाचवताना पोहता न आल्याने वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना फुलंब्री तालुक्यातील पाल शिवारात गट क्रमांक ५२ मध्ये घडली. याप्रकरणी फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.किशोर तेजराव जाधव, वय ४२ रा. पाल तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फुलंब्री तालुक्यातील पाल शिवारात गट क्रमांक ५२ मध्ये किशोर जाधव यांची पाच एकर शेती आहे. शेतीला पाणी मिळावं यासाठी जाधव यांनी एक एकरमध्ये शेततळं तयार केलं. शेततळे तुडुंब भरलं आहे. किशोर जाधव यांचा मुलगा शेततळ्यातून पाईप बाहेर काढत असताना पाय घसरून तळ्यात पडला.

मुलगा पडल्याचं किशोर यांनी पाहिलं. मुलाला वाचवण्यासाठी पोहता येत नसतानाही किशोर यांनी शेततळ्यात उडी घेतली. अथक परिश्रमानंतर कसंबसं मुलाला कठड्यापर्यंत आणलं. यावेळी भाच्याने मामेभावाला हात देऊन बाहेर काढलं.मात्र पोहता येत नसल्यामुळे किशोर जाधव हे बाहेर येऊ शकले नाही. किशोर हे पाण्यात बुडत असताना मुलगा आणि भाच्याने मदतीसाठी प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आलं नाही. त्यांनी आरडाओरड करत गावात जाऊन ही माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच ग्रामस्थांनी तातडीने अग्निशामक विभागाला पाचारण केलं. तब्बल एक तासानंतर अग्निशामक दलाची गाडी आली, तोपर्यंत मात्र किशोर जाधव यांचा मृत्यू झाला होता.

अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. मृत किशोर जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई – वडील असं कुटुंब आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जमादार कैलास राठोड करत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.