बुलढाण्यात ४० हजार रुपयांसाठी मृतदेह ६ तास अडवून ठेवला? नातेवाइकांचा आरोप; रुग्णालय म्हणते, पैसे…

शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी तोडफोडीचा इशारा दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन हादरले. अखेर शिवसैनिकांनीच हा मृतदेह उचलून नातेवाइकांच्या ताब्यात दिला.उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह चाळीस हजार रुपयांच्या बिलासाठी रोखून ठेवल्याचा प्रकार मलकापुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये बुधवारी घडला. शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी तोडफोडीचा इशारा दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन हादरले. अखेर शिवसैनिकांनीच हा मृतदेह उचलून नातेवाइकांच्या ताब्यात दिला.मलकापूर तालुक्यातील शिराढोण येथील कमलबाई यादव इंगळे (वय ६८) या ५ एप्रिल रोजी घरात पाय घसरून पडल्या. डावा हात व पाय फ्रॅक्चर झाला. त्यांना हकिमी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून ७ एप्रिलला रात्री आठ ते दहा वाजेदरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

उपचार सुरू असताना ९ एप्रिल रोजी पहाटे चार वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने कमलबाई इंगळे यांचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने चाळीस हजार रुपये बिल बाकी असल्याचे सांगत मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. याबाबत माहिती समजताच शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ यांच्यासह शिवसैनिक रुग्णालयात दाखल झाले. मृतदेह का दिला जात नाही, याचा जाब विचारत हॉस्पिटलची तोडफोड करण्याचा इशारा दिला. त्यानंतर रुग्णालय प्रशासन नरमले. मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आला.‘माझ्या आईचा पहाटे चार वाजता मृत्यू झाला. रुग्णालयाच्या संचालकांनी मृतदेह ताब्यात देण्यासाठी ४० हजार रुपये मागितले. मात्र आम्ही नकार दिला.

शिवसेना पदाधिकारी आल्यानंतर मृतदेह आमच्याकडे सुपूर्द करण्यात आला.’ असे मृतक महिलेचा मुलगा योगेश इंगळे यांनी सांगितले.पैसे मागितले ही चुकीची माहिती४० हजार रुपये मागितले, ही चुकीची माहिती आहे. मृतदेह कोणत्याही पद्धतीने अडविला नाही. जन आरोग्य योजनेतून उपचार करण्यासाठी आधी अप्रूव्हल घ्यावे लागते. ते पूर्ण झाले असेल तर कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही. इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन इन्फरमेशन घेतल्या गेले नव्हते. त्या प्रोसेसला वेळ लागतो. आरोग्य मित्र आल्यानंतर ९.३५ वाजता मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी केली नाही, असे हकिमी हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी अनुप मालपाणी यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.