रात्री दारूच्या नशेत पत्नीला ठार केलं; नशा उतरल्यावर पश्चाताप, सकाळी पतीचं टोकाचं पाऊल.

सोलापुरात एका व्यक्तीने दारुच्या नशेत पत्नीला ठार केलं, तर वडिलांना जखमी केलं. सकाळी नशा उतरल्यावर भयंकर पश्चाताप झाला. व्यक्तीने स्वत:चं आयुष्य संपवलं.व्यक्तीने दारूच्या नशेत पत्नी आणि वडिलांना मारहाण केली. वडिलांचा हात फ्रँकचर केला आणि पत्नीला ठार केलं. दुसऱ्या दिवशी नशा उतरल्यावर पश्चाताप झाला आणि स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) या ठिकाणी घडली आहे. वैराग पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. वसंत अंबादास पवार आणि आयनाबाई ऊर्फ सोनाबाई वसंत पवार अशी मृत दाम्पत्याची नावं आहेत.वैराग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथे वसंत पवार (वय ५५) हे खेळणी विकण्याचा व्यवसाय करतात. शेतामध्ये शेड बांधून पती-पत्नी आणि वडील असे एकत्र राहत होते. वसंत यांना दारूचं व्यसन असल्यामुळे त्यांची पत्नी आयनाबाई ऊर्फ सोनाबाई हिच्याशी किरकोळ स्वरूपाचे वाद होत होते.

मंगळवारी रात्री असेच दारू पिऊन आल्यानंतर वसंत यांनी पत्नी आयनाबाई आणि वडील अंबादास या दोघांनाही किरकोळ वादातून लाकडी दांडक्याने मारहाण केली.वसंत याने केलेल्या मारहाणीत आयनाबाई यांच्या डोक्याला आणि तोंडाला जबर मार लागला होता. आयनाबाई या हल्ल्यात जागीच गतप्राण झाल्या. वसंत पवार याने वडील अंबादास लक्ष्मण पवार यांनाही त्याच रात्री लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. अंबादास यांचा डावा हात फॅक्चर झाला आहे. मंगळवारी रात्री पियालेल्या दारूची नशा बुधवारी सकाळी उतरल्यानंतर रात्रीच्या मारहाणीत वडिलांचा हात फॅक्चर झाला आणि पत्नीचा मृत्यू झाला आहे, हे वसंतला कळालं.

वसंत पवार याने दारूच्या नशेत वडील आणि पत्नीला जबर मारहाण केली होती. पत्नी तर जागीच ठार झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर वसंत पवार याला घोर पाश्चाताप झाला. आपण केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला. वसंत याने बुधवारी सकाळी बदामाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मुलगा राम वसंत पवार याने वैराग पोलिसांना घटनेची सविस्तर माहिती दिली.दारू पिऊन पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पतीनेही बदामाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने सोलापूर सुन्न झालं आहे. दारूच्या नशेत किरकोळ वाद झाला आणि पत्नीला मारहाण करत तिला ठार केल्याचा त्यालाही पश्चाताप झाला आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.