सामना गमावताच राजस्थानला मोठा धक्का, कर्णधार संजूला बसणार लाखोंचा फटका.

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना रंगला. या सामन्यात गुजरातने ५८ धावांनी सामन्यात विजय मिळवला आणि गुजरातचा हा चौथा विजय आहे. राजस्थानच्या संघाकडूल कालच्या सामन्यात मोठी चूक घडली आणि ही चूक दुसऱ्यांदा घडली.राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना रंगला. या सामन्यात गुजरातने ५८ धावांनी सामन्यात विजय मिळवला आणि गुजरातचा हा चौथा विजय आहे. राजस्थानला आतापर्यंत पाच सामन्यांपैकी २ सामने जिंकता आले आहे. राजस्थानच्या संघाकडून कालच्या सामन्यात मोठी चूक घडली आणि ही चूक दुसऱ्यांदा घडली. राजस्थानला सामना गमावल्यानंतर अजून एक मोठा धक्का बसला.राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे प्रकरण गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये आरआर संघ स्लो-ओव्हर रेटसाठी दोषी आढळला होता.

कर्णधार सॅमसनला स्लो-ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्याची ही दुसरी वेळ आहे. आयपीएल २०२५ च्या नवीन नियमांनुसार, पहिल्यांदाच स्लो-ओव्हर रेटसाठी दोषी आढळल्यास १२ लाख रुपयांचा दंड आकारला जातो.यावेळी केवळ संजू सॅमसनच नाही तर राजस्थान रॉयल्सच्या संपूर्ण संघाला पराभव पत्करावा लागला आहे. बीसीसीआयने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “आयपीएल २०२५ च्या सामन्या क्रमांक-२३ मध्ये स्लो-ओव्हर रेटसाठी दोषी आढळल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि त्याच्या संघाला दंड ठोठावण्यात आला आहे.” निवेदनात पुढे म्हटले आहे की,

आयपीएल नियमांच्या कलम २.२ अंतर्गत संजू सॅमसनला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. प्लेइंग इलेव्हनमधील इतर सदस्यांना आणि प्रभावी खेळाडूंनाही ६ लाख रुपये किंवा सामना शुल्काच्या २५ टक्के रक्कम भरावी लागेल.प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २१७ धावा केल्या, ज्यामध्ये साई सुदर्शनच्या ८२ धावांच्या शानदार खेळीने महत्त्वाची भूमिका बजावली. प्रत्युत्तरात, राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ १५९ धावांवर गारद झाला. ५८ धावांच्या या मोठ्या विजयामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. गुजरातने आता ५ सामन्यांत ४ विजय मिळवले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.