तनिषा भिसेच्या कुटुंबियांनी एकनाथ शिंदेंची आर्थिक मदत नाकारली, ५ लाखांची रक्कम घेण्यास नकार.

तनिषा भिसे गर्भवती महिलेच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे यांनी दिलेली आर्थिक नदत नाकारली आहे. वैद्यकीय मदत कक्षाने दिलेली ५ लाखांची रक्कम त्यांनी नाकारली असून रुग्णालयावर कारवाईची मागणी केली आहे.पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. मृत गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आर्थिक मदत नाकारली आहे. सुशांत भिसे यांनी ही रक्कम नाकारली आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्भवती महिलेच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली होती. मात्र ती मदत भिसे कुटुंबियांनी नाकारली आहे. याआधीही भिसे कुटुंबियांना चंद्रकांत पाटील यांच्याकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली होती.

पण ती देखील भिसे कुटुंबियांनी नाकारली होती.एकनाथ शिंदेंच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून पाच लाख रुपये देण्यात येत होते. पण ते भिसे कुटुंबियांनी नाकारले. ही आर्थिक मदत नाकारत त्यांनी आम्हाला पैसे नको, पण दिनानाथ रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. तसंच यापुढे कधीही अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रयत्न करा अशी विनंतीही गर्भवती महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे.

गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची इच्छा दाखवली. एकनाथ शिंदे यांनीही कुटुंबाला ५ लाखांची रक्कम देण्याचं ठरवलं होतं. पण कुटुंबाने ही आर्थिक मदत घेण्यास नकार दिला आहे. आर्थिक मदत नाकारण्यामागे कुटुंबाने कारणही दिलं आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत याची काळजी घ्या. पैसे नको, तर अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करा. तसंच आता दिनानाथ रुग्णालयात डॉक्टरांनी राजीनामा दिला असला तरी रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा, चुकीच्या डॉक्टर आणि रुग्णालयावर कारवाई करा, अशी मागणी भिसे कुटुंबाने केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.