पतीच्या उपचारासाठी रुग्णालयात, छायालता ताईंना हॉस्पिटलबाहेरच डॉक्टरच्या कारने चिरडलं, वेदनादायक अंत.

 रुग्णालयाच्या आवारात घडलेल्या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघात घडला त्यावेळी या कारचे मालक डॉक्टर आर. के. दास कार चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. पतीच्या उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या एका वृद्ध महिलेला डॉक्टरच्या कारने चिरडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरात हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. या भीषण अपघातात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. छायालता आरेकर (वय ७० वर्ष) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. अपघाताची ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे.पालघर तालुक्यातील बोईसर परिसरात टॅप्स रुग्णालय आहे. छायालता विश्वनाथ आरेकर (वय ७०) या त्यांचे पती विश्वनाथ आरेकर यांच्या उपचारासाठी रुग्णालयात आल्या होत्या. रुग्णालयातील तपासणी व उपचार झाल्यानंतर छायालता आरेकर रुग्णालयातून बाहेर पडल्या.रुग्णालयातून बाहेर पडून पाच ते दहा पावलं चालत नाही, तोवर एमएच 04 इएक्स 2960 क्रमांकाची मारुती एस्टिलो कार वेगाने रुग्णालयाच्या आवारात शिरली.

या कारने रुग्णालयातून बाहेर येणाऱ्या वृद्ध महिलेला जोरदार धडक देत कारखाली चिरडले. या भीषण अपघातात
कार खाली चिरडल्याने छायालता आरेकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे.रुग्णालयाच्या आवारात घडलेल्या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघात घडला त्यावेळी या कारचे मालक डॉक्टर आर. के. दास कार चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर बोईसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक व बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा बोईसर पोलिसांमार्फत करण्यात आला असून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अपघातस्थळी असलेली कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी अधिक तपास बोईसर पोलीस करत आहेत.

दुसरीकडे, सिन्नर-शिर्डी मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकींवरील तीन जण जखमी झाले.धनगरवाडी येथील सुदाम रामजी बर्डे आणि सिंधू किशोर बर्डे हे दुचाकीवरून सिन्नर-शिर्डी मार्गाने वावीच्या दिशेने जात होते. याचवेळी संजय यादवराव डांगे (२६, रा. पोहेगाव) शिर्डीकडून सिन्नरच्या दिशेने दुचाकीवरून येत होते. दातली फाट्यावरील कट पॉइंटजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर टक्कर झाली. अपघातात डांगे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारांसाठी नाशिक येथे दाखल करण्यात आले. तर, दुसऱ्या दुचाकीवरील सिंधू किशोर बर्डे (५०) आणि सुदाम रामजी बर्डे (३५) हे दोघे किरकोळ जखमी झाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.