कुठे पाऊस, तर कुठे उष्णतेची लाट; मुंबईसह राज्यभरात कसं असेल हवामान? हवामान खात्याचा अंदाज काय.

राज्यातील हवामानबाबात विभागाने अंदाज नोंदवला आहे. राज्यात उष्ण आणि दमट हवामान असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मागील आठवड्यात राज्यभरातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. या अवकाळीने हातातोंडाशी आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कोकणात अवकाळीने आंबा, काजू पिकावरही परिणाम झाला आहे. या अवकाळीनंतर पुन्हा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तसंच राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज नोंदवला आहे. शहर आणि उपनगरांमध्ये आकाश प्रामुख्याने निरभ्र राहिल. तर मुंबई उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

कमाल तापमान ३६°C आणि आणि किमान तापमान २४°C च्या आसपास असेल.राज्यभरातील हवामान अंदाज विभागाने वर्तवला आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णता असण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.विदर्भात आज १० एप्रिल रोजी वादळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागात वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळं आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसंच ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.दुसरीकडे कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.दरम्यान, राज्यभरात सूर्य आग ओकत असून मोठ्या प्रमाणात तापमानाचा पारा वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे. अकोल्यात सर्वाधिक ४४.१ तापमान गेलं असून धुळे, जळगाव, अमरावतीमध्ये ४३ अंशांवर तापमान पोहोचलं आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.