लेक बुडत असल्याचं पाहून आईनं नदीत उडी घेतली, भाचीनंही वाचवण्याचे प्रयत्न केले पण..

ठाण्यातील शहापूर येथे एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर येत आहे. लेक बुडत असल्याचे पाहून आईनं नदीत उडी घेतली. भाचीनंही दोघांना वाचवण्याचे प्रयत्न केले मात्र तिघेही बुडाले.ठाण्यातील शहापूर तालुक्यातील भातसा नदीत तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेक आणि भाची यांचा बुडून मृत्यू झाला.. यामध्ये एक लहान १५ वर्षीय मुलाचा समावेश असून जीवरक्षक पथकाच्या सदस्यांनी तीनही मृतदेह बाहेर काढले आहेत. यासंबंधीची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली . ही घटना शहापूर तालुक्यातील गोठेघर वाफे येथील भातसा नदीत घडली आहे. वनिता सुदर्शन शेळके (वय ३३ रा. वाफे) लक्ष्मी दत्तात्रय पाटील (वय ५० रा. चेरपोली) धीरज दत्तात्रय पाटील (वय १५ वर्ष रा . चेरपोली ) ही मृत व्यक्तींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मृत लक्ष्मी आणि वनिता या दोन महिला कपडे धुण्यासाठी दुपारच्या सुमारास वाफे येथील भातसा नदीवर गेल्या होत्या. वनिता या लक्ष्मी यांच्या भाची होत्या. त्या दोघांसोबत लक्ष्मी यांचा मुलगा धीरज देखील गेला होता. उन्हाचा तडाखा असल्याने धीरज अंघोळ करण्यासाठी नदी पात्रात उतरला. मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. तो बुडत असल्याचे लक्षात येताच. त्याची आई लक्ष्मी यांनी त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र त्याही बुडू लागल्या. हे पाहताच वनिता यांनी नदी पात्रात उतरत दोन्ही माय लेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

मात्र दुर्देवाने तिघांचा ही नदीत बुडून दुदैवी मृत्यू झाला .वाफे येथील भातसा नदीत तीन जण बुडाल्याची माहिती पोलिस व जीवरक्षक टिमच्या सदस्यांना मिळताच तत्काल घटनास्थळी पोहोचून शोध घेत तीनही जणांना बाहेर काढले मात्र तोपर्यंत या माय लेक व भाची यांची प्राण ज्योत मावळली होती. या घटनेने सर्वांचे मन हेलावून गेले आहे. या तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर येथील उप जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. ही घटना समजात पाटील आणि शेळके परिवारावर शोककळा पसरली आहेच आणि ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.