पुण्यात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, दोघांचा होरपळून मृत्यू; परिसरात खळबळ.

पुण्यातील वारजे इथे गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी मध्यरात्री ही भीषण घटना समोर आली. पुण्यात गॅस सिलेंडर ब्लास्टची भीषण घटना घडली आहे. वारजे येथील माळवाडी, सर्वे नंबर ५२ गोकुळ नगर इथे एका पत्र्याच्या घरात मंगळवारी मध्यरात्री सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. ९ एप्रिल रोजी, मंगळवारी १ वाजून ५६ मिनिटांनी सिलेंडरचा ब्लास्ट झाला. या स्फोटात दोन जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे.या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं. स्फोट झाल्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केलं. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत सिलेंडरच्या स्फोटात लागलेली आग विझवण्याचं काम सुरू केलं.

अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत गॅस सिलेंडरच्या स्फोटात लागलेली आग विझवली. यावेळी घरामध्ये दोन पुरुष जखमी अवस्थेत आढळले. त्या दोन जखमी व्यक्तींना पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ससून येथे रवाना केलेल्या जखमींची नावं मोहन माणिक चव्हाण (वय वर्षे ४३), अतिश मोहन चव्हाण, (वय वर्षे २५) आहेत.वारजे इथे पत्र्याच्या घरात झालेला सिलेंडरचा स्फोट इतका भीषण होता, की सिलेंडरचे सर्व भाग वेगळे झाले.

सिलेंडरची वरची रिंगदेखील सिलेंडरपासून वेगळी होत उडाली. सिलेंडर पाच-सहा भागात फुटला असून या स्फोटात घरातील सर्व भांडी, इतर सामान, संपूर्ण घर उद्धवस्त झालं आहे. संपूर्ण घरात वस्तू उडून, त्या फुटल्या असून सामानाची राखरांगोळी झाली आहे. सिलेंडरच्या स्फोटात गॅसदेखील पूर्णपणे फुटला असून त्याचे विविध भागात तुकडे झाले आहेत. पत्र्यांचं बांधकाम असलेल्या घराचे पत्रे पूर्णपणे उडाले आहेत.या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या स्फोटाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचून सिलेंडरचा स्फोट नेमका कसा झाला, आगीच्या कारणाचा तपास केला जात आहे. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.