घरातल्या जिन्यात खेळता खेळता आक्रित, नववीतील राजनंदिनीचा तडफडून मृत्यू, सोलापुरात हळहळ.

राजनंदिनी कांबळे या विद्यार्थिनीला राहत्या घरात विजेचा जबर शॉक लागला. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा घरातील जिन्यावर पडल्या होत्या सोलापूर शहरात मंगळवारचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी काळवार ठरला. मंगळवारी एकाच दिवसात दोन अतिशय दुर्दैवी घटना घडल्या. अनुराग राठोड या शाळकरी विद्यार्थ्याचा स्कूल बसच्या चाकाखाली येऊन मंगळवारी दुपारी मृत्यू झाला. या घटनेने सोलापूर शहर हळहळले. ही घटना ताजी असताना मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

राजनंदिनी कांबळे या विद्यार्थिनीला राहत्या घरात विजेचा जबर शॉक लागला. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा घरातील जिन्यावर पडल्या होत्या. नंदिनी जिन्यावर जाताना तिला विजेचा जबर धक्का बसला, त्यातच राजनंदिनी कांबळे हिला प्राण गमवावे लागल्याची माहिती आहे.सोलापूर शहरात मंगळवारी सांयकाळी वादळी वारा सुटून अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या होत्या. सोलापूर शहरात असलेल्या जुना एम्प्लॉयमेंट चौकातील कोनापुरे चाळ येथे विजेच्या तारा तुटल्या होत्या, अशी नागरिकांनी माहिती दिली. सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली.

त्यामुळे वादळी वारा सुरू झाल्याने शहरात बऱ्याच वेळ लाईट गेली होती.कोणापूरे चाळमधील नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा हलू लागल्या होत्या. कांबळेंच्या घरावरुन जाणाऱ्या विजेच्या तारेचा स्पर्श त्यांच्या लोखंडी जिन्याला झाल्याने त्यामध्ये करंट उतरला होता. त्याच वेळी राजनंदिनी हिचा स्पर्श त्या जिन्याला झाल्याने तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती जागीच कोसळली.नातेवाईकांनी तातडीने तिला सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कोनापुरे चाळ परिसरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.