धाड…धाड…धाड! विठुरायाचं दर्शन घेऊन आले अन् भर रस्त्यात पती पत्नीवर गोळीबार, सोलापूर हादरलं .

सोलापूरधील मोहोळ तालुक्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पती-पत्नीवर रस्त्यावरून जात असताना गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. नेमकं गोळीबाराचे कारण काय? कोणी केला गोळीबार? सविस्तर जाणून घ्या.सोलापूर जिल्ह्यात  थरारक घटना घडली आहे. पूर्व वैमनस्यातून पती-पत्नीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना येवती, ता. मोहोळ येथे मंगळवार ता. 8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता येवती- रोपळे मार्गावर घडली. शिवाजी जाधव आणि सुरेखा जाधव अशी गोळीबारात Solapur Firing News जखमी झालेल्या पती पत्नीची नावे आहेत. दरम्यान त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबाराची घटना घडल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस दल अलर्ट झाले असून घटनास्थळी सर्वच अधिकाऱ्यांनी धाव घेतली.गोळीबार करून दशरथ केराप्पा गायकवाड हा संशयित फरार झाला आहे.

सोलापूर पोलिसांनी संशयित आरोपीच्या शोधासाठी एक अधिकारी व 10 कर्मचाऱ्यांचे पथक रवाना केले आहे. घटना स्थळाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक शेंडगे यांना तपासा बाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी अधिक माहिती दिली.पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, शिवाजी जाधव व सुरेखा जाधव हे पती-पत्नी मंगळवारी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. ते दर्शन आटोपून येवतीकडे येत असताना येवती- रोपळे रस्त्यावर ते आले असता दशरथ गायकवाड याने त्या पती-पत्नीवर गोळ्या झाडल्या. त्यात ते दोघेही जखमी झाले आहेत.

चार वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून ही घटना घडली आहे. संशयीत आरोपी दशरथ केरु गायकवाड (वय 25 वर्षे,रा,येवती ता मोहोळ,जि सोलापूर) याने आता तुम्हाला माझा हिसका दाखवतो, असे सांगत गोळीबार केला. गोळीबार होताच येवती रोपळे रस्त्यावर जागोजागी जिवंत काडतुसे आणि दोन मॅक्झिन पोलिसांना मिळून आल्या.जखमी पती-पत्नीला तातडीने पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबार होताच येवती रोपळे रस्त्यावर जागोजागी जिवंत काडतुसे व दोन मॅक्झिन पोलिसांना मिळून आल्या.दरम्यान घटना स्थळावर ठसे तज्ञांना पोलिसांनी पाचारण केले होते. घटना स्थळावर पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पंढरपूरचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर मोहोळ व पंढरपूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. उशिरा पर्यंत फिर्याद घेण्याचे काम सुरू होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.