ॲपवर मार्गाचे भाडे दाखविले जाते. प्रवासी रिक्षात बसल्यानंतर चालक मीटरप्रमाणे भाडे घेणार असल्याचे सांगतो. त्यावरून प्रवासी आणि रिक्षाचालकांत वादावादी होऊ लागली आहेपुण्यात ॲपवरून रिक्षा सेवा देणाऱ्या ‘उबर’ या कंपनीने रिक्षा बुकिंगनंतर प्रवाशांकडून मीटरप्रमाणेच पैसे घेण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांना भाड्याचे पैसे थेट रिक्षाचालकांना द्यावे लागणार आहेत; पण चालकांनी याची माहिती प्रवासी बसताना द्यावी लागणार आहे. दरम्यान, यावरून वादावादीचे प्रसंगही घडत आहेत.
उबर कंपनीने रिक्षाचालकांसोबत एक करार केला आहे. ‘सॉफ्टवेअर आधारित सेवा देणारी कंपनी असल्याने रिक्षाचालक व प्रवाशांनी भाडे ठरवावे,’ असे या करारात म्हटले आहे. त्यानुसार, ‘उबर’वरून रिक्षा चालविणाऱ्यांनी मीटरप्रमाणे भाडे घेण्यास सुरुवात केल्याने पुन्हा वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत.ॲपवर मार्गाचे भाडे दाखविले जाते. प्रवासी रिक्षात बसल्यानंतर चालक मीटरप्रमाणे भाडे घेणार असल्याचे सांगतो. त्यावरून प्रवासी आणि रिक्षाचालकांत वादावादी होऊ लागली आहे. त्यावर मोबाइल ॲपवरून रिक्षा चालविणाऱ्यांनी मीटरप्रमाणेच भाडे घ्यावे. रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून जास्त भाडे घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा ‘आरटीओ’ने दिला आहे.









