पुण्यात ट्रेनिंगसाठी आलेल्या तरुणीसोबत धक्कादायक प्रकार, अत्याचार करत २५ लाख उकळले; काय घडलं.

पुण्यात प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीसोबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीवर अत्याचार करत तिच्याकडून २५ लाख रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे.पुण्यात ट्रेनिंगसाठी आलेल्या एका तरुणीसोबत अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. ट्रेनिंगसाठी पुण्यात आलेल्या तरुणीवर अत्याचार करण्यात आला. त्याशिवाय तिच्याकडून २५ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपी कबीर अहमद खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यात प्रशिक्षणासाठी आली होती. या काळात आरोपी कबीर अहमद खान याने तिच्याशी संपर्क साधला. आरोपीने तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केले.

तरुणीला धमक्या देऊन तिच्याकडून तब्बल २५ लाख रुपये उकळले. असेच काही दिवस गेले. अखेर पीडित तरुणीने हिम्मत दाखवत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गंभीर्य ओळखून पोलिसांनी कारवाई करत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.७ ऑक्टोबर २०२४ पासून आतापर्यंत तरुणीवर अत्याचार केले आहेत. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला पुणे, मुंबई, नेपाळ, थायलंड, सांताक्रूझ येथे नेत तिच्या अत्याचार करण्यात आले. तिला विविध कारणं देत तिच्याकडून २५ लाख रुपये उकळले. तसंच आरोपीने तरुणीला तिचे पैसे परत करण्याचं सांगितलं होतं, मात्र तरुणाने टाळाटाळ केल्यानंतर याप्रकरणी तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

विश्रांतवाडी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद व्यक्तींबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे.शहरात फसवणूकीच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. त्यातून अशा घटना घडण्यास आळा बसेल. या घटनेने पुणे आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.