छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम व्यवसायिकाला विवस्त्र करुन बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.प्लॉट खरेदी – विक्रीचं काम करून टेंडर देणाऱ्या तरुणाने काम सोडून दुसऱ्या ठिकाणी काम सुरू केलं. याचा राग मनात धरुन पोलीस पुत्राकडून बांधकाम व्यवसायिकाचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर डोक्यावर पिस्तूल लावून तुला जीवे मारून डोंगरात फेकून देतो, माझं कुणी काही करणार नाही, अशी धमकी दिली. व्यावसायिकाच्या मित्राला दाबून ठेवत त्याचा लॅपटॉप मोबाईल हिसकावण्यात आला. हा संपूर्ण प्रकार सुधाकर नगर परिसरामध्ये घडला. याप्रकरणी पोलीस पुत्रासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










