४३ वर्षीय कॅबचालकाची घाणेरडी मागणी, नवी मुंबईत १९ वर्षीय तरुणीने प्रियकराच्या साथीने जीव घेतला.

सुरेंद्रने रियाकडे शरीरसुखाची मागणी केली होती. यामुळे चिडलेल्या रियाने प्रियकर विशालला बोलावलं. यावेळी तिघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. दोघांनी मिळून सुरेंद्रचा खून केला. घर बंद करुन त्याचा मृतदेह तसाच टाकून दोघांनी पोबारा केला.नवी मुंबईतील उलवे भागात राहणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीची हत्या करून संगमनेर येथे पळून गेलेले प्रेमी युगुल कुटुंबीयांच्या सांगण्यावरून पोलिसांसमोर हजर झाले. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सुरेंद्र आसाराम पांडे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, तो मूळचा प्रयागराज येथील होता. तो व्यवसायाने कॅब चालक होता.सुरेंद्रची रिया सरकल्याणसिंग (१९) हिच्यासोबत ओळख झाली.

ती नोकरीच्या शोधात होती. पांडेने तिला आपल्या घरामध्ये आसरा दिला. रियाने विशाल शिंदे (२१) याला बोलावून घेतले. तिघांमध्ये भांडण झाले. यावेळी रिया व विशालने हातोडा मारून पांडेची हत्या केली. शनिवारी रात्री सुरेंद्र पांडे यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती.सुरेंद्रने रियाकडे शरीरसुखाची मागणी केली होती. यामुळे चिडलेल्या रियाने प्रियकर विशालला बोलावलं. यावेळी तिघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. दोघांनी मिळून सुरेंद्रचा खून केला. घर बंद करुन त्याचा मृतदेह तसाच टाकून दोघांनी पोबारा केला.घरातून तीव्र वास आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं आणि सुरेंद्रच्या हत्येचा उलगडा झाला. कुटुंबीयांच्या सांगण्यावरून विशाल आणि रिया यांनी आत्मसमर्पण केलं. त्यानंतर संगमनेर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र पांडे हा उलवे येथील सेक्टर-२४ येथील क्रियांस रेसिडेन्सीमध्ये एकटाच राहत होता आणि उदरनिर्वाहासाठी कॅब चालवत होता. तो साधारण महिन्याभरापूर्वी पंजाबमधील रहिवासी असलेल्या रियाला भेटला होता आणि नोकरी शोधण्यास मदत करण्याचं आश्वासन देऊन त्याने रियाला आपल्या घरी आश्रय दिला होता.काही दिवसांपूर्वी रियाने संगमनेर येथील तिचा प्रियकर विशाल शिंदे याला पांडेच्या घरी राहण्यासाठी बोलावले होते. २ एप्रिल रोजी पांडे आणि या जोडप्यात वाद झाला होता. त्यांनी पांडेवर हातोड्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्याला जीव गमवावा लागला. त्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळला, घराला बाहेरून कुलूप लावले आणि पांडेची गाडी घेऊन पळून गेले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.