शरद पवार पक्षाचे अजित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तुषार खरात विरोधात केलेल्या ५ कोटींच्या खंडणीप्रकरणात पोलिसांनी दहिवडीच्या अजित पवारांना ताब्यात घेतलं आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी दहिवडी पोलीस ठाण्यात पत्रकार तुषार खरात यांच्याविरोधात पाच कोटी रुपयांच्या खंडणीची तक्रार दाखल केली होती. त्याच प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अजित पवार यांना दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांना सातारा येथील दहिवडी पोलिसांनी प्रकरणात ताब्यात घेतले आहे. त्यामुळे माण तालुक्यात राजकीय, सामाजिक वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले, की राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या तक्रारीनुसार खंडणी प्रकरणात तुषार खरात यांना दहिवडी पोलिसांनी मुंबईमधून ताब्यात घेतले होते.










