पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भिसे कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी तात्काळ संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे.पुण्याच्या नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार नाकारल्याने तनिषा भिसेंचा प्रसूतीवेळी मृत्यू झाला. त्यांनी जुळ्यांना जन्म दिला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणात दीनानाथ रुग्णालयावर मोठे आरोप करण्यात आले आहेत. तर, रुग्णालयातील डॉ. सुश्रूत घैसास यांनी प्रसूतीसाठी २० लाख मागितल्याचा आरोप आहे. यादरम्यान डॉ. सुश्रूत घैसास यांनी आज स्वत:हून राजीनामा दिला.










