पती शेवटच्या घटका मोजत होता, पत्नीने मोबाईलमध्ये स्टेटस ठेवत संपवलं आयुष्य; पुण्यात एकाच सरणावर दोघांवर अंत्यसंस्कार.

पती शेवटच्या घटका मोजत असतात विरह नको म्हणून पत्नीनेही इंद्रायणीच्या ढोहात घेतली जलसमाधी घेतली. नांदेडच्या चक्रवार दाम्पत्यावर एकाच सरणावर आळंदीत अंत्यसंस्कार करण्यात आले.कॅन्सरमुळे पती शेवटची घटका मोजत होता. हे लक्षात येताच पत्नीने देखील त्याचा विरह नको म्हणून, इंद्रायणी नदीत उडी घेऊन टोकाचं पाऊल उचललं. पत्नीनेही आत्महत्या करत आयुष्याची अखेर केली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मृत दाम्पत्य हे मूळ नांदेड येथील रहिवासी होतं. पण पुण्यात वास्तव्यास होतं. रविवारी पती – पत्नीच्या मृत्यूनंतर आळंदीत दोघांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गंगाधर चक्रावार (वय ६५) आणि गंगाणी उर्फ मंगल चक्रावार (वय ५५) अशी मृत पती – पत्नीची नावं आहेत. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली. एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे ‘जिएंगे और मरेंगे भी साथ साथ’, अशीच जणू या दोघांनी आयुष्याची खून गाठचं बांधली होती आणि त्यांचा शेवटही तसाच झाला.चक्रावार दांम्पत्य हे नांदेड शहरातील चौफाळा येथील रहिवासी होते. पाच वर्षापूर्वी संपूर्ण कुटुंबीय पुणे येथील आळंदीत स्थलांतर झालं. पती – पत्नी हे दोघे आळंदी येथील गुरु महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या दरबारात सेवा करत होते. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. या दरम्यान गंगाधर चक्रावार यांना कॅन्सरचं निदान झालं. त्यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होतं नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्यास सांगितलं.गंगाधर चक्रवार हे घरी शेवटची घटिका मोजत होते. आपल्या पतीचा अंतिम क्षण जवळ आला आहे, हे समजताच पत्नी गंगाणी यांनी रविवारी ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जातं आहे, असं सांगून त्या घराबाहेर पडल्या. त्यांनी माऊलींचं दर्शन घेतलं. नंतर इंद्रायणी नदीत उडी घेऊन स्वतःला संपवत आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. मृत्यू आधी त्यांनी मी देव दर्शनाला जात आहे, असे मोबाईलमध्ये स्टेटस देखील ठेवलं.आई घराबाहेर पडल्यानंतर तिथे घरात वडिलांनी देखील अखेरचा श्वास घेतला. तिकडे आई घरी न आल्याने मुलांनी शोधाशोध सुरू केली. याच दरम्यान रात्री उशिरा मुलांना आपल्या आईचा मृतदेह आळंदी येथील इंद्रायणी नदीत आढळ्याची माहिती मिळाली. या घटनेने चक्रावार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. रविवारी दुपारी एकाच सरणावर दोघांवर आळंदी येथील नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

  • Related Posts

    गणेश नाईकांबद्दल संजय शिरसाटांचे मोठे विधान, म्हणाले, प्रत्येकाला मेळावे घेण्याचे अधिकार.

    मंत्री संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमध्ये विविध विषयांवर भाष्य केले. एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर त्यांनी भाष्य केले. गणेश नाईक यांच्या मेळाव्यावर त्यांनी भाष्य केले. ​लोकसभेला कसा विजय मिळाला, यावरून त्यांनी विरोधकांना…

    औरंगजेबदेखील फिका पडेल, त्याने आपल्या पत्नीला जेलमध्ये टाकलं नसेल, करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका.

    करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना औरंगजेबदेखील फिका पडेल अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली आहे. माझा २७ वर्षांचा प्रवास क्रूर वृत्तीचा होता असंही त्या म्हणाल्या.राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    गणेश नाईकांबद्दल संजय शिरसाटांचे मोठे विधान, म्हणाले, प्रत्येकाला मेळावे घेण्याचे अधिकार.

    गणेश नाईकांबद्दल संजय शिरसाटांचे मोठे विधान, म्हणाले, प्रत्येकाला मेळावे घेण्याचे अधिकार.

    औरंगजेबदेखील फिका पडेल, त्याने आपल्या पत्नीला जेलमध्ये टाकलं नसेल, करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका.

    औरंगजेबदेखील फिका पडेल, त्याने आपल्या पत्नीला जेलमध्ये टाकलं नसेल, करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका.

    शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांच्या अडचणीत वाढ, आधी अ‍ॅट्रॉसिटी दाखल, आता लाखोंच्या पाणीचोरीचा आरोप.

    शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांच्या अडचणीत वाढ, आधी अ‍ॅट्रॉसिटी दाखल, आता लाखोंच्या पाणीचोरीचा आरोप.

    IPL 2025 सुरु असताना KKRचा मोठा निर्णय, मुंबईकडून टेनिस क्रिकेट खेळणारा गोलंदाजाला आता संघात सामील केलं.

    IPL 2025 सुरु असताना KKRचा मोठा निर्णय, मुंबईकडून टेनिस क्रिकेट खेळणारा गोलंदाजाला आता संघात सामील केलं.