कोर्ट मूकदर्शक राहू शकत नाही! अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात हाय कोर्टाचा राज्य सरकारला दणका.

बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला जोरदार दणका दिला आहे. एन्काऊंटर प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाला दिले आहेत.बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला जोरदार दणका दिला आहे. एन्काऊंटर प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाला दिले आहेत. मुंबई पोलीस सहआयुक्त क्राईम यांना या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आलेले आहेत.

‘अक्षयच्या पालकांनी हा विषय पुढे न्यायचा नसल्याची भूमिका घेतल्यानंतर हे प्रकरण बंद करणे सोपे ठरले असते. पोलिसांनी अक्षयच्या मृत्यूच्या प्रकरणात एफआयआर नोंदवण्याबाबतही उदासीन भूमिका घेतली. त्यामुळे पालक हतबल झाले. अशावेळी घटनात्मक कोर्ट केवळ मूकदर्शक बनून राहू शकत नाही,’ असं निरीक्षण न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाचे आदेश देताना नोंदवलं.’न्याय केवळ करणं आवश्यक नसतं, तो दिसणंही आवश्यक असतं. या प्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल पाहिला असता, सखोल तपास होणे आवश्यक असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याचा आदेश आम्ही देत आहोत’, असंही खंडपीठानं स्पष्ट केलं. न्यायालयानं मुंबई पोलिस दलातील पोलिस सहआयुक्त लखमी गौतम यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचा आदेश दिला. तसंच एसआयटीमध्ये कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश करायचा, याचा निर्णय घेण्याची मुभा त्यांना दिली.अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणातील पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारनं घेतली होती. चौकशी पूर्ण होत नाही, एसआयटीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत त्यांच्या विरोधात कारवाई शक्य नसल्याचं राज्य सरकारनं म्हटलं होतं. पण उच्च न्यायालयानं यावरुन राज्य सरकारला दणका दिला. ‘या प्रकरणात दंडाधिकारी न्यायालयानं दिलेला अहवाल स्पष्ट आहे. त्यातून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलेले आहेत. पोलिसांकडून झालेली कारवाई योग्य नसल्याचं या अहवालात म्हटलेलं असताना गुन्हा का दाखल होत नाही,’ असा सवाल न्यायालयानं विचारला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.