कौटुंबिक वादातून पतीचा पत्नी, सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसला, ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकला अन्…

या घटनेमुळे नाशकात मोठी खळबळ उडाली आहे . आगीत जखमी झालेल्या पत्नी आणि सासू वर खासगी रुग्णालयात तर पतीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत . राज्यात गुन्हेगारीने कळस गाठलाय . नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनारी गावात पतीने पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .कौटुंबिक वादातून पतीने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे .मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून त्याने ज्वलनशील पदार्थ टाकून पत्नी आणि सासूला जाळण्याचा प्रयत्न केला .या घटनेत पत्नी स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे आगीत होरपळून  गंभीररित्या जखमी झाल्या आहेत . जाळण्याचा प्रयत्न करणारा पती केदार हंडोरेही या आगीत जखमी झाला आहे.या घटनेमुळे नाशकात मोठी खळबळ उडाली आहे . आगीत जखमी झालेल्या पत्नी आणि सासू वर खासगी रुग्णालयात तर पतीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत . (Nashik)सिन्नर तालुक्यातील सोनारी गावची धक्कादायक घटना समोर आली आहे .

कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि  सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय .मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून ज्वलनशील पदार्थ पतीने टाकला .त्यामुळे घराला आग लागली .या आगीत बायको स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे गंभीररित्या भाजल्या गेल्याने जखमी झाल्या आहेत .पत्नी आणि सासूला जाळण्याचा प्रयत्नांत  पती केदार हंडोरे स्वतःही जखमी झाला असून पत्नी 50 टक्के तर सासू 65 भाजल्या असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .पतीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत . श्रीजी मेडिसिन हॉस्पिटलमध्ये रात्री दोनच्या सुमारास दोन रुग्ण रुग्णवाहिकेतून आणण्यात आले.  दोन्ही पेशंटला ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून जाळण्यात आले आहे. यामागे कौटुंबिक वाद होते. दोघी झोपेत असताना पतीने स्वत:वरही लिक्विड टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

यात नवविवाहित तरुणी (19)  50 टक्के भाजली गेली आहे. व तिची आई (38) या जवळजवळ 65 टक्के भाजली गेली आहे. दोघींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने तरुणीवर चक्क चाकू हल्ला केल्याची घटना अकोल्यात घडलीय. 25 वर्षीय तरुणानं 22 वर्षीय वैद्यकीय नर्स असलेल्या तरुणीला चाकूने भोकसून तिचा खून करण्याचा प्रयत्न केलाय. संतोष डिवरे असं चाकू हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. बोरगाव मंजू पोलिसांनी त्याला अटक केली असून  पुढील तपास सध्या केला जात आहे. अकोल्यातल्या बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील सोनाळा रस्त्यावर ही घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • Related Posts

    महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे प्रबोधन सप्ताहाचा आजचा पाचवा दिवस.

    महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे प्रबोधन सप्ताहाचा आजचा पाचवा दिवशीच्या कार्यक्रम म्हणजे दोन महामानवांचा जयंतीचा उत्सव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अशा या…

    काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांना अटक, बिहारमध्ये सुरू होती पदयात्रा, ताब्यात घेण्याचं कारण काय?

    कन्हैया कुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे. बिहारमध्ये बेरोजगारी आणि स्थलांतराच्या विरोधात काँग्रेसचे नेते एनएसयुआयचे प्रभारी कन्हैया कुमार पदयात्रा करत होते.बिहारमध्ये बेरोजगारी आणि स्थलांतराच्या विरोधात काँग्रेसचे नेते एनएसयुआयचे प्रभारी कन्हैया…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे प्रबोधन सप्ताहाचा आजचा पाचवा दिवस.

    महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे प्रबोधन सप्ताहाचा आजचा पाचवा दिवस.

    काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांना अटक, बिहारमध्ये सुरू होती पदयात्रा, ताब्यात घेण्याचं कारण काय?

    काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांना अटक, बिहारमध्ये सुरू होती पदयात्रा, ताब्यात घेण्याचं कारण काय?

    कोरटकरवर हल्ल्याची भीती, पोलिसांनी मीडियाच्या गाड्या रोखल्या; ‘त्या’ बातमीनं सगळ्यांनाच चकवा.

    कोरटकरवर हल्ल्याची भीती, पोलिसांनी मीडियाच्या गाड्या रोखल्या; ‘त्या’ बातमीनं सगळ्यांनाच चकवा.

    देवाला बकरा देण्यास निघाले, कारला भीषण अपघात; चौघे देवाघरी, पण बकऱ्यालाच देव पावला.

    देवाला बकरा देण्यास निघाले, कारला भीषण अपघात; चौघे देवाघरी, पण बकऱ्यालाच देव पावला.