अक्षय शिंदे बनावट एन्काऊंटर प्रकरणी हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका, पोलिसांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश.

या प्रकरणाशी संबंध असलेल्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश असतानाही राज्य सरकारने त्यामध्ये टाळाटाळ केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.बदलापूरच्या अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला आहे. या प्रकरणातील संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. त्यावर पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश या आधीच न्यायालयाने दिले होते. आता या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकरता राज्य सरकारनं केलेली मागणी फेटाळण्यात आली. बदलापूरच्या एका शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला होता.

सुनावणीच्यावेळी त्याला नेण्यात येत असताना मुंब्र्याच्या परिसरात त्याचा एन्काऊंटर करण्यात आला.मात्र हा एन्काऊंटर बनावट असल्याचा अहवाल नंतर समोर आला. त्यानंतर या प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पोलिस सहआयुक्त गुन्हे यांना या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी पोलिसांवर कारवाईची मागणी करत याचिका दाखल केली होती. या घटनेबाबत दंडाधिकारी कोर्टानं पोलिसांच्या कारवाईवर ठपका ठेवला होता.

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित बनावट एन्काऊंटर प्रकरणी हायकोर्टात दाखल याचिकेवर सोमवारी सुनावणी पार पडली. याप्रकरणी उच्च न्यायालयाने आरोपी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले असतानाही राज्य सरकार टाळाटाळ करत असल्यानं न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी सीआयडी चौकशीचा अहवाल बाकी असल्याचा दावा सुनावणीवेळी राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आला. तसेच, ठाणे सत्र न्यायालयानं यात हस्तक्षेप करत संबंधित पोलिसांना दिलासा दिल्याच्या निर्णयाला राज्य सरकारकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.