घृणास्पद! आईच्या प्रियकरानेच ६ वर्षीय चिमुकलीवर केला अत्याचार, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या.

 जालना शहरात अत्यंत निंदनीय घटना घडली आहे. एका विभक्त महिलेच्या ६ वर्षीय मुलीसोबत तिच्या प्रियकरानेच घृणास्पद कृत्य केले आहे,जालना शहरात अत्यंत निंदनीय घटना घडली आहे. एका विभक्त महिलेने आपल्या मुला मुलीला बापाचे नाव लागावे, मुलं मोठी झाल्यावर समाजात वावरत असताना आपल्या मुलाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले नाही पाहिजे. मुलांनी विचारले तर आमचा बाप कोण तर ते दाखवता आलं पाहिजे, अशा विचाराने ती महिला प्रशांत वाडेकरसोबत लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. पण तिने स्वप्नात देखील विचार केला नसेल, असे घृणास्पद कृत्य तिच्या प्रियकराने केले आहे.परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक २८ वर्षीय महिला पतीपासून विभक्त झालेली असून ती जुना जालना भागात भाड्याच्या खोलीत राहते. तिला पहिल्या पतीपासून तीन मुली व एक मुलगा झालेला असून त्यापैकी एक मुलगा व एक मुलगी पतीकडे जिंतूर येथे राहतात. तर एक ६ वर्षीय व दुसरी ४ वर्षीय मुलगी तिच्याकडे राहत.

ही महिला साफसफाई आणि घरगुती काम करून तिचा व मुलींचा उदरनिर्वाह करत होती. दोन वर्षांपूर्वी तिची एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या प्रशांत प्रकाश वाडेकर याच्याशी ओळख झाली होती. तेव्हापासून ती महिला आणि वाडेकर हे दोघे दोन वर्षांपासून भाड्याच्या खोलीत लिव्ह इनमध्ये राहत होते.सदर महिला साडेतीन वाजेपर्यंत कामानिमित्त घराबाहेर असते. तर वाडेकर हा दिवसभर घरी राहून रात्री ०७:३० वाजेनंतर हॉटेलमध्ये ड्युटीवर जातो. शनिवारी ५ एप्रिलला प्रशांत वाडेकरने त्याची प्रेयसी घरी नसताना तिच्या ६ वर्षीय मुलीसोबत आधी अनैसर्गिक कृत्य केले आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील केला.

या प्रकारामुळे भयभीत झालेल्या चिमुकलीला भरपूर ताप भरला. मोठ्या प्रमाणात उलट्याही होत होत्या. वाडेकर ड्युटीवर गेल्यानंतर त्या मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. यापूर्वीही वाडेकरने त्या चिमुकलीसोबत असे घृणास्पद प्रकार केल्याचे तिने आईला सांगितले. यानंतर महिलेने कदीम जालना पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, पोलीस उपनिरीक्षक किशोर वनवे यांनी तातडीने आरोपी प्रशांत वाडेकर याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, हा गुन्हा पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे.

  • Related Posts

    रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगवेळी डान्सर कृष्णा नदीत बुडाला; नेमकं काय घडलं?

    रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’सिनेमाच्या शूटींगवेळी डान्सर कृष्णा नदीत बुडाल्याची माहिती समोर आलीये. अभिनेता रितेश देशमुख याच्या ‘राजा शिवाजी’सिनेमाच्या शूटींगवेळी दुर्घटना घडलीये.साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी सिनेमाचं शूटींग सुरु असताना एक दुर्घटना…

    पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता शाहरुख खानची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…

    पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता शाहरुख खानची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 28 पर्यटकांचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगवेळी डान्सर कृष्णा नदीत बुडाला; नेमकं काय घडलं?

    रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगवेळी डान्सर कृष्णा नदीत बुडाला; नेमकं काय घडलं?

    पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता शाहरुख खानची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…

    पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता शाहरुख खानची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…

    पुढील 72 तास महत्त्वाचे, पहलगाममधील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्व दौरे रद्द, दहशतवाद्यांचा होणार खात्मा.

    पुढील 72 तास महत्त्वाचे, पहलगाममधील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्व दौरे रद्द, दहशतवाद्यांचा होणार खात्मा.

    आईचा फोन, संजयला गोळी लागलीय… डोंबिवलीतील आत्ते-मामे भावंडांवर पहलगाममध्ये तिहेरी घाला.

    आईचा फोन, संजयला गोळी लागलीय… डोंबिवलीतील आत्ते-मामे भावंडांवर पहलगाममध्ये तिहेरी घाला.