वक्फ विधेयकाविरुद्ध कोर्टात जाणार नाही; उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भूमिका.

आम्ही आमची भूमिका मांडली आहे. यापुढे वेळ येईल, तेव्हा बोलता येईल, अशी भूमिका मांडत शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधेयकाविरोधात न्यायालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले.‘वक्फ संशोधन विधेयकाविरोधात काँग्रेसला न्यायालयात जायचे असेल, तर जाऊ द्या. आम्ही आमची भूमिका मांडली आहे. यापुढे वेळ येईल, तेव्हा बोलता येईल,’ अशी भूमिका मांडत शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधेयकाविरोधात न्यायालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. ‘भाजपला खिश्चन समाजाकडे असलेल्या जमिनी घ्यायच्या असून, नंतर हिंदू देवस्थानांच्या जमिनीवरही त्यांचा डोळा आहे,’ असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत संमत झाले. या विधेयकास शिवसेना उबाठा पक्षाने विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे यांनी भूमिका मांडली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’मधील एका लेखात, वक्फनंतर कॅथोलिक चर्च आणि संबंधित संस्थांकडे असणाऱ्या सात कोटी हेक्टर जमिनीकडे वेधले आहे. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘वक्फविषयी आम्ही आमची भूमिका मांडली आहे. या विधेयकाबाबत भाजपला हिंदूंशी काही घेणे-देणे नाही. त्यांचा छुपा अजेंडा ‘ऑर्गनायझर’ने उघड केला आहे. भाजप वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घेऊन, त्यांचा मित्रांना देणार आहे. त्यानंतर पुढची पायरी म्हणून ख्रिश्चन समाजाकडे असणाऱ्या जमिनी घेणार आहे. हळूहळू बौद्ध, शीख, जैन धर्मीयांकडील जमिनी सरकार घेणार आहे.

मग हिंदू देवस्थानांच्या जमिनीवरसुद्धा त्यांचा डोळा आहे.’‘भाजप या सर्व मोक्याच्या जमिनी घेऊन त्यांच्या मित्रांना देईल. भाजपचे हे प्रेम समाजाबद्दल नाही, तर त्यांच्या मित्रांवर आहे. धर्माधर्मांत भांडणे लावण्याचे काम भाजप करत आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यानंतर रक्कम वाढवण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले. पण मते मिळाल्यावर आता लोकांची फसवणूक केली. यामुळे या लोकांची रामाचे नाव घेण्याची पात्रता नाही,’ असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.