दोघं भेटले आणि अचानक वाद सुरू झाला; तरुणाकडून प्राणघातक चाकू हल्ला, तरुणी गंभीर जखमी, कारण काय.

अकोल्यात तरुणाने तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.प्रेमप्रकरणातून एका तरुणाने तरुणीवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. अकोल्यातील बोरगाव येथे ही घटना घडली आहे. हल्ला करणारा आरोपी तरुण पसार होण्याच्या बेतात होता. मात्र तो पसार होत असतानाच
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर सोनाळा रोडवर एका २५ वर्षीय तरुणाने २२ वर्षीय तरुणीवर धारदार चाकूने पोटात वार केले. चाकूच्या प्राणघातक हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तरुणीच्या पोटावर केलेला चाकू हल्ला इतका भयंकर होता, की तरुणीच्या पोटातील आतडे बाहेर आले. जखमी तरुणीला उपचारासाठी अकोला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ही घटना रविवारी ६ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. दिवसाढवळ्या झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण पसरलं आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष प्रकाश डिवरे, वय २५, रा. जवळा तालुका शेगाव, हा तरुण एका २२ वर्षीय युवतीला आपल्या कारमधून बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनाळा रोडवर घेऊन आला होता, दोघेही एकमेकांचे मित्र-मैत्रिण होते. दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादानंतर तरुणाने तरुणीवर धारदार चाकूने पोटात वार करून प्राणघातक हल्ला केला, या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली, तिला गंभीर अवस्थेत सोडून तरुण घटनास्थळावरुन पळ काढत होता.

मात्र तो पसार होत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.सदर घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेतील आरोपी पसार होण्याच्या बेतात असताना संतोष प्रकाश डिवरे याला ताब्यात घेतलं. तर गंभीर जखमी तरुणीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं. याप्रकरणी पुढील तपास बोरगाव पोलीस करत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.