भरधाव टिप्परची धडक, कार पानठेल्यात घुसून चक्काचूर, गॅरेज संचालकाचा चिरडून अंत.

हसन हे कारने कळमेश्वरकडे जात होते. गोरेवाडा परिसरात मागून आलेल्या भरधाव टिप्परने कारला धडक दिली. टिप्पर कारसह काही अंतरावरील पानठेल्यात घुसला.भरधाव टिप्परने मागून कारला धडक दिली. त्यानंतर टिप्पर कारसह काही अंतरावरील पानठेल्यात घुसला. या भीषण अपघातात मोहननगर येथील हसन गॅरेजचे संचालक जऊर हसन (वय ७७, रा. छावणी, सदर) ठार तर दोन जण जखमी झाले. ही थरारक घटना रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. राजकुमार दुबे आणि सचिन यादव अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी टिप्पर मालक व चालकाविरुद्ध प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून चालकाला अटक केली. अविनाश रामचंद्र भोयर (वय २९, रा. कन्हान) असे अटकेतील चालकाचे नाव आहे.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, हसन हे एमएच-३१-ईए-९१९९ या क्रमांकाच्या कारने कळमेश्वरकडे जात होते. गोरेवाडा परिसरात मागून आलेल्या भरधाव टिप्परने (एमएच -४०- बीजी ८१९१) कारला धडक दिली.

टिप्पर कारसह काही अंतरावरील पानठेल्यात घुसला. यात पानठेल्याजवळ उभे असलेले राजकुमार व सचिन जखमी झाले.अपघातात कार चक्काचूर झाली. हसन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांना मिताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून हसन यांचा मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. जखमींनाही हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी शोध घेऊन टिप्परचालकाला अटक केली. टिप्पर मालक इंद्रजित वहिले यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याचे टिप्परचालक पोलिसांना सांगत आहे.दुसरीकडे, मुंबईतील अंधेरी-कुर्ला रोडवरून एक महिला आपल्या ७० वर्षांच्या वडिलांसोबत रात्री ९.३०च्या सुमारास चालत होती. याचवेळी भरधाव कारने तिच्या वडिलांना धडक दिली. अपघातानंतर कारचालकाने त्यांना रुग्णालयात दाखल केले.

मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करताच तो फरार झाला. याप्रकरणी सहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चालकाचा शोध सुरू आहे.तिसऱ्या घटनेत पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी येथे दोघे जखमी अवस्थेत पडले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिची शहानिशा करण्यासाठी विक्रोळी पोलिस घटनास्थळी पोहोचले. नूर सरातुल्ला आणि प्रवीण भोगले या दोन जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. नूरला डॉक्टरांनी मृत घोषित केले. नूर हा आपल्या अन्य दोन मित्रांसह दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना त्यांनी प्रवीण याला धडक दिली. अपघात झाल्याचे पाहून पळत असताना दुचाकीवर मागे बसलेला नूर खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.