‘ती’ कृती शोभणारी नाही; दीनानाथ रुग्णालय प्रकरणावरुन मेधा कुलकर्णींचा भाजपला घरचा आहेर.

नुकसानभरपाई दिल्यास पदाची व पक्षाची प्रतिष्ठा वाढेल, अशा शब्दांत राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी भारतीय जनता पक्षाला घरचा आहेर दिला.‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाशी संबंधित तनिषा भिसे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आवश्यक माहिती न घेताच भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा सदस्यांनी केलेले वर्तन आणि कृती पक्षाला निश्चितच शोभणारी नाही. त्यामुळे शहराध्यक्षांनी संबंधितांना समज द्यावी. यासोबत दिलगिरी व्यक्त करून नुकसानभरपाई दिल्यास पदाची व पक्षाची प्रतिष्ठा वाढेल,’ अशा शब्दांत राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी भारतीय जनता पक्षाला घरचा आहेर दिला.या प्रकरणासंदर्भात प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना खरमरीत पत्र लिहून संबंधितांना योग्य समज देण्याची मागणी केली आहे. ‘इतरांचे वर्तन हा आपला विषय नाही. मात्र, डॉ. सुश्रुत घैसास यांच्या वडिलांचे क्लिनिक फोडणे हे भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा व अन्य पदाधिकाऱ्यांना निश्चितच शोभले नाही.

कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचे हे काम नाही. घैसास यांच्या क्लिनिकचा या घटनेशी काहीही संबंध नसताना केलेले तोडफोडीचे कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे,’ असे या पत्रात म्हटले आहे.या कृत्याबाबत मोठी नाराजी आहे. पक्षाची, व्यक्तीची राजकीय प्रतिमा बनवण्यासाठी वेळ लागतो; परंतु अशा काही गोष्टींमुळे प्रतिमा डागाळते. विनाकारण एखाद्या व्यक्तीचे, समूहाचे व विशिष्ट समाजाचेही कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते, याकडे प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी लक्ष वेधले आहे.

गर्भवतीचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. असा प्रसंग कोणावरही येऊ नये. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने याबाबत खुलासा केल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.‘आंदोलनाच्या इतर सभ्य पद्धती आहेत. त्याचा अवलंब करणे विचारधारेला धरून ठरले असते. वैद्यकीय क्षेत्रात बऱ्यावाईट गोष्टी असल्या, तरी समाजात चांगले डॉक्टरही आहेत. सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाण्याचे किंवा इतर अनेक सोपे मार्ग निवडण्याचे मोह कार्यकर्त्यांनी टाळले पाहिजेत, हे शहराध्यक्ष म्हणून आपण समजावून सांगाल आणि महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज देऊन आपल्या पदाचा समजदारपणे व विनम्रतेने वापर करण्यास सांगाल, अशी मला आशा आहे. त्यालाच नुकसानभरपाई व दिलगिरीची जोड दिल्यास पदाची आणि पक्षाची प्रतिष्ठा वाढेल,’ असे निरीक्षण कुलकर्णी यांनी नोंदविले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.