व्याजाने पैसे देणे तरुणाला पडले महागात, भर चौकात काढला काटा, बारामतीत खळबळ.

बारामती तालुक्यातील सोरटेवाडी गावात आर्थिक वादातून रोहित सुरेश गाडेकर याचा धारदार शस्त्राने खून झाला. या प्रकरणी अमोल आणि सागर माने या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. रोहित याने आरोपींना व्याजाने रक्कम दिली होती आणि त्याचे १५ लाख रुपये मागून घेतल्याने खून झाला.आर्थिक वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना बारामती तालुक्यातील सोरटेवाडी गावच्या हद्दीतील घडली. रोहित सुरेश गाडेकर (वय २७, रा. मासाळवस्ती, सोरटेवाडी, ता. बारामती) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. वडगाव निंबाळकर पोलिसांनी या प्रकरणी अमोल वसंत माने व सागर वसंत माने (रा. सोरटेवाडी) या दोघा भावांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात मयत रोहित याचा भाऊ अविनाश सुरेश गाडेकर यांनी फिर्याद दिली. शनिवारी (दि. ५) रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादीला रविवारी रात्री (दि.६) १२.४४ वाजता विनायक हरीहर याने फोन करत भाऊ रोहित याच्या तोंडावर, मानेवर, चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे सांगितले. तसेच त्याचा मृतदेह कुलकर्णी चारी ते शेंडकरवाडी रस्त्यावर गोरख खेंग्रे यांच्या पोल्ट्रीफार्मनजीक रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले.

तेथे विनायक हरीहर व इंद्रजित माने हे दोघे थांबले होते. घटनेची माहिती समजताच अविनाश हे हेमंत गाडेकर, याच्यासह कुलकर्णी चारीजवळ गेले. त्यावेळी तेथे रोहित हा गंभीर जखमी अवस्थेत निपचित पडला होता. त्याची हालचाल पूर्ण बंद झाली होती. त्याच्या चेहऱ्यावर, तोंडावर, मानेवर, हातावर धारदार शस्त्राने वार झालेले होते. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मृतदेहापासून काही अंतरावर रोहित याची कार रस्त्याच्या बाजूला उभी केल्याचे दिसून आले.इंद्रजित माने यांनी या घटनेची खबर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याला दिली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह तपासणीसाठी पाठवला.दरम्यान मृत रोहित याने गावातील अमोल व सागर या दोघांना व्याजाने रक्कम दिली होती. त्याचे १५ लाख रुपये तो मागत होता. त्या कारणावरून दोघांनी संगनमत करून त्याला पैसे घेण्यासाठी बोलावून घेत त्याचा खून करत ते पसार झाल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे वडगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी सांगितले. उपनिरीक्षक राहूल साबळे अधिक तपास करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.