भाजप आमदाराला सवतासुभा भोवला, ‘सह्याद्री’वर शरद पवारांच्या शिलेदाराची सत्ता, बाळासाहेब पाटलांचा विजयाचा गुलाल.

संपूर्ण राज्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री कारखान्याची लढत तीन पॅनलमुळे चुरशीची झाली. या निवडणुकीत आमदार मनोज घोरपडे व ॲड. उदयसिंह उंडाळकर यांनी एकाकी झुंज दिल्याचे पाहण्यास मिळाले.सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीनंतर दोन्ही फेऱ्यांचा निकाल रविवारी रात्री उशिरा जाहीर झाला. माजी सहकारमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनेलने ८००० मताधिक्याने विजय मिळाला आहे. यानिमित्ताने पाटील यांनी सह्याद्री कारखान्यावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलला सरासरी १५ हजार ५०० मते मिळाली, तर आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला सरासरी ७५०० मते मिळाली. काँग्रेसचे निवास थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष कदम, भाजपा युवा मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांच्या पॅनेलला सरासरी २२०० मते मिळाली आहेत.संपूर्ण राज्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री कारखान्याची लढत तीन पॅनलमुळे चुरशीची झाली. या निवडणुकीत आमदार मनोज घोरपडे व ॲड. उदयसिंह उंडाळकर यांनी एकाकी झुंज दिल्याचे पाहण्यास मिळाले.

भाजपच्या दोन शिलेदारांनी सवतासुभा केल्यामुळे या निवडणुकीत भाजपाचे आमदार मनोज घोरपडे यांना ही निवडणूक अवघड जाणार असेच काहीसे चित्र निर्माण झाले होते. याचा फटका घोरपडे यांना बसल्याचे दिसून आले. मुळातच तीन पॅनेलमुळे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे राजकीय विश्लेषक सांगत होते. सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतील विजयामुळे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड उत्तर येथील राजकारणाला विधानसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा बळकटी मिळाल्याचे दिसून येत आहे. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी निकाल लागताच गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.सह्याद्री कारखान्यासाठी शनिवारी सातारा, कराड, कोरेगाव, खटाव, कडेगाव या तालुक्यातील ९९ केंद्रांवर मतदान झाले. ३२ हजार २०५ सभासद मतदानासाठी पात्र होते. त्यातील २६ हजार १०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे ८१.७ टक्के मतदान झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या आदेशाने मतमोजणी आज रविवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला. पहिल्या टप्यात एक ते ५० मतदान केंद्राची मतमोजणी करण्यात आली.

त्यात बाळासाहेब पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनलने आघाडी घेतली. सुमारे ४००० मतांनी त्यांचे पॅनेल आघाडीवर होते. ही मतमोजणी दुपारी दोनच्या सुमारास पूर्ण झाली. त्यात कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे पी. डी. पाटील पॅनेल सुमारे चार हजार मतानी आघाडीवर राहिले आहे. सह्याद्री कारखान्याची निवडणूक तब्बल २५ वर्षानंतर होवून त्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. पी. डी. पाटील पॅनेलचे विजयी उमेदवार.शामराव पांडुरंग पाटील : १५०२७,आण्णासो रामराव पाटील : १५५०१,संभाजी शंकर साळवे : १४४९३,सुरेश नानासाहेब माने : १५१९१,विजय दादासाहेब निकम : १४७७०,संजय बापूसाहेब गोरे : १५२६६,जयंत धनाजी जाथव : १४७८८,सुनील ज्ञानदेव जगदाळे : १४८६७,नेताजी रामचंद्र चव्हाण : १५५२७ राजेंद्र भगवान पाटील : १४८२८,संतोष शिदोजीराव घार्गे : १४७७१,अरविंद निवृत्ती जाधव : १४५०२,राजेंद्र रामराव चव्हाण : १५०८९,कांतीलाल बाजीराव भोसले १५४९८,रमेश जयसिंग माने : १५०७१,राहुल शिवाजी निकम : १४७०६,दीपक मानसिंग लादे : १५५७०,सिंधुताई बाजीराव पवार : १४८१५,लक्ष्मी सांभाजी गायकवाड : १५१४०,संजय दतात्रय कुंभार : १५५९६,दिनकर शंकर शिरतोडे : १५५८०माझ्याकडे पैसा आहे, आपण काही करू शकतो. या भ्रमात राहून अर्थकारणाच्या जोरावर राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीचा सह्याद्री साखर कारखान्याच्या सभासदांनी वेळेत बंदोबस्त केला आहे, अशी खोचक टीका माजी आमदार, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आमदार मनोज घोरपडे यांच्यावर केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.