भारतीय नौदल बनले देवदूत; ओमानच्या किनाऱ्यावर पाकिस्तानी मच्छिमाराचे वाचवले; नेमकं काय घडलेलं.

भारतीय नौदलाच्या एका युद्धनौकेने ओमानच्या किनाऱ्याजवळील एका मासेमारी नौकेवरील पाकिस्तानी कर्मचाऱ्याला तातडीची महत्त्वपूर्ण वैद्यकीय मदत पुरवली.अरबी समुद्राच्या मध्य क्षेत्रात तैनात भारतीय नौदलाच्या एका युद्धनौकेने ओमानच्या किनाऱ्याजवळील एका मासेमारी नौकेवरील पाकिस्तानी कर्मचाऱ्याला तातडीची महत्त्वपूर्ण वैद्यकीय मदत पुरवली. या कर्मचाऱ्यावर शस्त्रक्रिया केल्याने पुढील अनर्थ टळला. नौदलाने रविवारी याबाबत माहिती दिली.भारतीय नौदलाच्या मोहिमेवर तैनात ‘स्टील्थ फ्रेग्रेट’ ‘आयएनएस त्रिकंद’ला ओमान किनाऱ्यापासून सुमारे ३५० सागरी मैल पूर्वेकडे कार्यरत इराणी नौका अल ओमीदी येथून संकटाची सूचना मिळाली. त्रिकंदने लागलीच मदतीचा हात पुढे केला. ‘तपास केला असता या नौकेवरील एक कर्मचारी इंजिनवर काम करत असताना जखमी झाल्याचे समोर आले.त्याच्या बोटांना गंभीर इजा झाल्याचे आढळले. त्याची प्रकृती चिंताजनक होती.

त्याला इराणच्या मार्गावर असलेल्या एफ. व्ही. अब्दुल रेहमान हंजिया या दुसऱ्या जहाजात स्थलांतरित केले होते,‘ असे नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.‘त्रिकंदने जखमी कर्मचाऱ्याला तत्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी आपला मार्ग बदलला. एफ. व्ही. अब्दुल रहमान हंजियाच्या कर्मचाऱ्यांमध्ये ११ पाकिस्तानी (नऊ बलूच आणि दोन सिंधी) आणि पाच इराणी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. जखमी पाकिस्तानी (बलुच) कर्मचाऱ्याला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते आणि हाताला गंभीर जखमा झाल्या होत्या. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्रावही झाला होता. परंतु वेळेवर उपचार झाले,’ असा तपशील नौदलाकडून देण्यात आला.

‘आयएनएस त्रिकंदचे वैद्यकीय अधिकारी, मार्कोस (मरीन कमांडो) आणि जहाजाची ‘बोर्डिंग टीम’ यांच्या पथकाने जखमीला वैद्यकीय मदत दिली. त्याला भूल दिल्यानंतर वैद्यकीय पथकाने बोटांवर शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया तीन तासांहून अधिक काळ चालली. रक्तस्त्राव वेळेवर नियंत्रणात आला. बोटांचे गँगरिनमुळे होणारे संभाव्य कायमस्वरूपी नुकसान टाळता आले,’ असे नौदलाने नमूद केले. ‘इराणला पोहोचेपर्यंत कर्मचाऱ्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अँटिबायोटिक्ससह वैद्यकीय सामग्रीही त्याच्यासोबत देण्यात आली.‘या मासेमारी नौकेवरील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सहकाऱ्याचा जीव वाचवल्याबद्दल भारतीय नौदलाबाबत कृतज्ञता व्यक्त केली,’ असेही नौदलाने म्हटले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.