पाम्बन सागरी पुलाचे लोकार्पण; अभियांत्रिकी तंत्राची कमाल, वरच्या दिशेने उचलला जाणारा देशातील पहिला पूल.

तमिळनाडूतील प्रसिद्ध रामेश्वरम बेटाला रेल्वेच्या मार्गाने जमिनीशी जोडणाऱ्या पाम्बन सागरी पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले. तमिळनाडूतील प्रसिद्ध रामेश्वरम बेटाला रेल्वेच्या मार्गाने जमिनीशी जोडणाऱ्या पाम्बन सागरी पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले. तसेच, रामेश्वरम-तांबरम (चेन्नई) या नव्या रेल्वेसेवेलाही पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. या सागरी पुलाच्या खालून मार्गक्रमण करू शकेल अशा तटरक्षक दलाच्या एका बोटीलाही पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. त्रिभाषा धोरण व मतदारसंघांच्या पुनर्रचनेवरून केंद्र सरकारला विरोध करणारे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या कार्यक्रमांकडे पाठ फिरवली.पाम्बनचा जुना रेल्वे पूल सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला होता. यामुळे रामेश्वरमसाठीच्या रेल्वेसेवेत खंड पडला होता. रविवारी लोकार्पण करण्यात आलेल्या पुलाच्या प्रकल्पास फेब्रुवारी २०१९मध्ये रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती. दळणवळण व पर्यावरणासंबंधी अनेक आव्हाने पार करत या पुलाची उभारणी करण्यात आली आहे.

रविवारी हा नवा पूल खुला झाल्याने रामेश्वरम बेटावरील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग पुन्हा एकदा उर्वरित देशाशी जोडले गेले आहे.या पुलाची लांबी २.०८ किमी असून तो देशातील पहिला व्हर्टिकल सी लिफ्ट (वरच्या दिशेने उचलला जाणारा) पूल ठरला आहे. या पुलाच्या उभारणीसाठी ५५० कोटी रुपये खर्च आला आहे. या पुलावर ९९ स्पॅन (दोन जोडण्यांमधील अंतर) असून वरच्या दिशेने उचलल्या जाणाऱ्या स्पॅनची लांबी ७२.५ मीटर आहे. या स्पॅनच्या ठिकाणी पूल २२ मीटरपर्यंत वर उचलता येईल. मोठ्या आकाराची जहाजे या पुलाखालून जाण्यासाठी या वैशिष्ट्याचा वापर होऊ शकेल. तसेच, त्याचवेळी या पुलावरून ट्रेनही धावू शकणार आहे. विशेष म्हणजे, देशी बनावटीच्या तंत्रज्ञानाच्या साह्याने हा देशातील पहिला व्हर्टिकल सी लिफ्ट पूल उभारण्यात आला आहे. भारतीय अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा तो आविष्कार मानला जात आहे.या ट्रेनमधून शालेय विद्यार्थ्यांनी सफारीचा आनंद लुटला. हातात तिरंगा घेतलेल्या या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

‘यापुढे रामेश्वरम हे पहिले अथवा अखेरचे स्थानक असणाऱ्या निवडक मेल व एक्स्प्रेस सोडण्यात येतील,’ अशी माहिती दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. ‘पाम्बन सागरी पूल हा गोल्डन गेट ब्रिज (अमेरिका), टॉवर ब्रिज (लंडन), ऑरसंड ब्रिज (डेन्मार्क, स्वीडन) या पुलांच्या बरोबरीच्या दर्जाचा आहे,’ असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.मुख्यमंत्री स्टॅलिन रविवारी उदकमंडलम येथे काही सरकारी कार्यक्रमांना उपस्थित होते. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे पूल उद्घाटन कार्यक्रमास मी उपस्थित राहू शकणार नाही, हे मी पंतप्रधान मोदी यांना आधीच कळवले होते, असे ते म्हणाले.या दौऱ्यादरम्यान रामेश्वरममधील प्रसिद्ध रामनाथ स्वामी मंदिरात पंतप्रधान मोदी यांनी रविवारी विधिवत पूजा केली. यावेळी त्यांनी पारंपरिक पद्धतीने धोतर नेसले होते व गळ्याभोवती उपरणे घेतले होते. विशेष म्हणजे, रामनवमीच्या निमित्ताने त्यांनी ही पर्वणी साधली. अयोध्या येथील राम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वीही ते या मंदिरात दर्शनासाठी आले होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.