महाविद्यालयात भाषण देताना तरुणीला आला दुर्देवी मृत्यू !

धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील महाविद्यालयात निरोप समारंभावेळी भाषण करत असताना विज्ञान शाखेच्या अंतिम वर्षात शिकणारी विद्यार्थिनी भोवळ येऊन कोसळली.

तिला रुग्णालयात दाखल केली असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. वर्षा खरात (वय २०) असे मृत तरुणीचे नाव आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे आज (दि.५) ही दुर्दैवी घटना घडली. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, परंडा येथील रागे शिंदे महाविद्यालयात बीएससीच्या अंतिम वर्षात वर्षा खरात शिकत होती. महाविद्यालयीन परीक्षा तोंडावर आल्याने विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी महाविघालयात निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषण करताना वर्षा आपल्या महाविद्यालयातील तीन वर्षांतील आठवणींना उजाळा देताना भावूक झाली. त्यानंतर ती भोवळ येऊन कोसळली. तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. वर्षाचे आईवडील शेतकरी असून तिच्या पश्चात आईवडील, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.