मंगेशकर रुग्णालयाच्या गच्चीवर चढून आंदोलन; अर्धनग्न झालेले ‘ते’ दोघे नेमके कोण? मागणी काय?

भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा यांचा प्रसुतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात जनक्षोभ उसळला आहे.भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा यांचा प्रसुतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात जनक्षोभ उसळला आहे. रुग्णालयाच्या बाहेर विविध संघटनांची आंदोलनं सुरु आहेत. लहूजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर घोषणाबाजी सुरु केली आहे. संघटनेचे दोन कार्यकर्ते रुग्णालयाच्या गच्चीवर चढले आहेत.लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरु केलं आहे. दोन कार्यकर्त्यांनी थेट गच्चीवर चढत अर्धनग्न आंदोलनाला सुरुवात केली आहे. दत्ता धडे आणि दादासाहेव कसबे अशी आंदोलकांची नावं आहेत.

डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत खाली न उतरण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी आणि मृत महिलेला न्याय मिळावा, अशी आंदोलकांची मागणी आहे.लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रुग्णालयाबाहेर जमले आहेत. त्यात महिलांचं प्रमाण लक्षणीय आहे. आम्हाला आता प्रशासनाकडून अडवलं जातंय. हे प्रशासन त्या दिवशी कुठे होतं? एका महिलेले पैसे नसल्यानं उपचार नाकारण्यात आले, तेव्हा प्रशासन काय करत होतं? त्या दोन चिमुकल्या बाळांचा काय दोष होता? त्यांनी तर आपली आई पाहिलीदेखील नव्हती. त्या बाळांनी आपली आई गमावली. तिच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?, अशी प्रश्नांची सरबत्ती एका महिलेनं केली.लहुजी शक्ती सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत शेण आणलं आहे. रुग्णालयाचे संचालक डॉ. केळकर यांनी निवेदन स्वीकारावं अशी त्यांची मागणी आहे. कालपासून अनेक संघटनांनी रुग्णालयबाहेर आंदोलनं केली आणि त्यांची निवेदनं दिली. रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी पालेकर यांनी ती स्वीकारली. मात्र लहूजी शक्ती सेनेचं आंदोलन सुरु असताना पालेकर बाहेर आलेले नाहीत. लहूजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी शेण सोबत आणल्यानं पालेकर निवेदन स्वीकारण्यास बाहेर आले नसल्याचं कळतं. काल काही आंदोलकांनी पालेकर यांच्यावर चिल्लर फेकत संताप व्यक्त केला होता.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.