थांब तुला उकळत्या पाण्यात टाकतो, १४ वर्षांच्या शेजाऱ्याची मस्ती जीवावर बेतली.

आराध्या रोहित पंचाळ या चार वर्षाच्या मुलीच्या आईने बटाट्याचे वेफर्स तयार करण्यासाठी पाणी उकळायला घातले होते. हे पाणी उकळल्यानंतर गॅसवरून काढून खाली ठेवले होते.लहान मुलं त्यांच्यापेक्षा लहान मुलांना भीती दाखवतात, त्यांची गंमत करायला जातात, पण कधी कधी गंमत एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात कदमवाक वस्तीमध्ये असाच एक दुर्दैवी प्रकार घडला. १४ वर्षाच्या मुलाने चार वर्षांच्या मुलीला उकळत्या पाण्यात टाकण्याची भीती घातली. दैवदुर्विलास म्हणजे ती मुलगी खरोखरच त्याच्या हातातून निसटून उकळत्या पाण्याच्या टाकीत पडली.हा प्रकार उघडकीस आला तोच मुलगी शुद्धीवर आल्यानंतर. कदमवाक वस्ती येथील कवडी माळवाडी परिसरात २३ मार्च रोजी घटना घडली. दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास आराध्या रोहित पंचाळ या चार वर्षाच्या मुलीच्या आईने बटाट्याचे वेफर्स तयार करण्यासाठी पाणी उकळायला घातले होते.

हे पाणी उकळल्यानंतर गॅसवरून काढून खाली ठेवले होते.त्याच वेळी शेजारचा १४ वर्षाचा मुलगा तिच्याशी खेळत होता. त्याने तिला उचलले आणि थांब तुला उकळत्या पाण्यात टाकतो अशी भीती घातली आणि त्याचवेळी खरोखरच आराध्या त्याच्या हातून निसटली आणि थेट उकळत्या पाण्याच्या टाकीत पडली.पाण्याच्या टाकीत पडताच तिने जोरात आरडाओरडा केला. तेवढ्यात तिची आई तिथे आली. त्यांनी तातडीने आराध्याला बाहेर काढून दवाखान्यात दाखल केले दोन दिवस ती बेशुद्ध झाली होती. शुद्धीवर आल्यानंतर तिने हा प्रकार सांगितला.

आराध्याचे वडील हे इलेक्ट्रिकचा व्यवसाय करतात. रोहित पांचाळ यांनी आराध्याकडून माहिती घेताच लोणी काळभोरचे पोलीस ठाणे गाठले आणि तिथे पोलिसांना सगळी माहिती सांगितली.दुसरीकडे, घरात खेळण्यासाठी साडीचा झोपाळा बांधत असताना अचानक फास लागून एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. वळसे (ता. सातारा) येथे मंगळवारी (दि. १ एप्रिल) दुपारी बारा वाजता ही दुर्दैवी घटना घडली. विश्वजित प्रमोद चव्हाण (वय १२) असे गळफास लागून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. दुपारी आई-बाबा घरी नसताना विश्वजितने झोपाळा बांधण्यासाठी आईची साडी घेतली. कॉटवर उभा राहून छताच्या अँगलला साडी बांधली. साडीची लांबी जास्त असल्यामुळे साडी त्याच्या गळ्याभोवती गुंडाळली गेली. कॉटवरून त्याचा पाय निसटल्याने त्याच्या गळ्याला फास लागला. आई घरी परतल्यावर ही घटना समोर आली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.