चहाच्या आडून तिकीट घोटाळा; चहावाल्याकडून रेल्वे अधिकाऱ्यांच्या बनावट सही-शिक्क्यांचा वापर.

 हा चहावाला व्हीआयपी कोटा वापरून महिन्याकाठी दीड ते दोन लाखांची कमाई करत होता, असे तपासात समोर आले आहे.उन्हाळ्यात चहाची मागणी कमी होऊन पर्यायी पेयांना मागणी वाढते. मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील चहावाल्याला उन्हाळी गर्दीच्या हंगामात विशेष मागणी होती. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना चहा देण्याचे काम करणाऱ्या या चहावाल्याने त्यांच्या बनावट सही-शिक्क्यांचा वापर करून व्हीआयपी कोट्यातून तिकीट कन्फर्म करण्याचे गैरकृत्य केले. दक्षता विभागाच्या निरीक्षकांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर कारवाई सुरू झाली आहे.हा चहावाला व्हीआयपी कोटा वापरून महिन्याकाठी दीड ते दोन लाखांची कमाई करत होता, असे तपासात समोर आले आहे. उन्हाळ्यात गर्दीच्या हंगामात प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळावे, यासाठी नियमित गाड्यांसह विशेष मेल-एक्स्प्रेस रेल्वे प्रशासनाकडून चालवण्यात येतात.

प्रत्यक्षात अनेकांना प्रतीक्षा यादीतील तिकिटावरच समाधान मानावे लागते. गर्दीतील धकाधकीचा प्रवास टाळण्यासाठी कन्फर्म तिकिटासाठी प्रवाशांची अधिक पैसे मोजण्याची तयारी असते.सीएसएमटीतील रेल्वे कॅण्टीनमध्ये रवींद्र कुमार साहू हा कामगार वरिष्ठ अधिकाऱ्यांना चहा देण्याचे काम करत होता. साहूने वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक, मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि मुख्य अभियंता अशा पदांवरील अधिकाऱ्यांचे सही-शिक्का बनावट तयार करून घेतले. प्रतीक्षा यादीतील तिकीट कन्फर्म करण्यासाठीच्या विनंती पत्रावर याचा वापर करून संबंधित तिकिटे तो कन्फर्म करून घेत होता, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.दक्षता विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई सुरू केली आहे.

त्याचबरोबर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात व्हीआयपी कोट्याचा गैरवापर करत रेल्वेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रेल्वे प्रशासनाने सुरू केली.मध्य रेल्वेच्या दक्षता विभागाचे मुख्य दक्षता निरीक्षक जितेंद्र शर्मा आणि आर. एस. गुप्ता यांचे पथक कोलकाता मेलमधील तिकीटधारकांची तपासणी करत होते. यावेळी काही प्रवाशांनी आम्ही अधिक पैसे देऊन कन्फर्म तिकीट घेतल्याचे सांगितले. दक्षता अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीची शहानिशा करत चौकशी सुरू केली. त्यावेळी सीएसएमटी रेल्वे कॅण्टीनमधील कामगार रवींद्र साहू हा व्हीआयपी कोट्याचा गैरवापर करत असल्याचे उघड झाले.दरम्यान, तीन महिन्यांपासून व्हीआयपी कोट्याचा गैरवापर करत रोज पाच-सहा तिकिटे कन्फर्म करत असल्याचे समोर आले. मात्र प्रत्यक्षात दोन वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू असल्याचा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रवाशांना कन्फर्म तिकीट देऊन त्यांच्याकडून हजारो रुपयांची कमाई करत असल्याची बाब चौकशीत उघड झाली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.