स्वयंपाक का केला नाही म्हणत पतीने केली पत्नीला मारहाण, पुढे जे घडले ते अत्यंत धक्कादायक, हनवटी खालीच…

छत्रपती संभाजीनगर येथे पतीने पत्नीवर स्वयंपाक न केल्याच्या कारणावरून चाकू हल्ला केला. या घटनेत आरोपी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, दुसऱ्या घटनेत तरुणावर हल्ला करुन त्याच्या आईलाही मारहाण करण्यात आली. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे आलीये. चक्क स्वयंपाक का केला नाही असे म्हणत पतीने पत्नीवर चाकू हल्ला केला आणि तिला ठार मारण्याचा धमकी दिली. हा प्रकार तीन मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जटवाडा रोडवरील होनाजीनगरात घडला. भारत मुंजा धोतरे (रा. होनाजीनगर, जटवाडा रोड) असे चाकू हल्ला करणाऱ्या आरोपी पतीचे नाव असून त्याच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात उषा भारत धोतरे (वय ३५, रा. होनाजीनगर) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, फिर्यादी या तीन मुले व एका मुलीसह राहत असून मजुरी काम करुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करते.

३ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास फिर्यादी या घरात स्वयंपाक करत होत्या. त्यावेळी आरोपी पती भारत हा मद्यप्राशन करुन आला व तु स्वयंपाक का केला नाही असे म्हणत शिवीगाळ करुन हाताचापटाने मारहाण केली.भाजी कापायचा चाकूने फिर्यादीच्या हनवटी खाली वार करुन गंभीर जखमी केले, तसेच जीवे ठार मारण्याचा धमकी देत दिल्याचे तक्रारीत नमूद केले. या प्रकरणात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदर गोरखनाथ पवार हे तपास करीत आहेत.

या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली. मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय.छत्रपती संभाजीनगरमध्येच दुसरीकडे तरुणावर चाकू हल्ला करुन, त्याच्या आईलाही मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री हर्सूल परिसरातील यासिननगरात घडली. याप्रकरणी अलीविरोधात गुन्हा दाखल झाला. आयाज अहेमद गुलाममुर्तुजा पटेल यांनी फिर्याद दिली. आरोपीने फिर्यादीचा मुलगा अबुबकरवर हल्ला केला. फिर्यादीची पत्नीमध्ये आली असता अलीने त्यांना देखील मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.