‘जळगाव मिरर’वृत्ताची दखल : अधिकाऱ्यांच्या आदेशाने ठेकेदाराने रस्त्याला लावला ‘मलम’!

शहरातील प्रभाग क्र.१ मधील सुरेश कलेक्शन ते मारोती चौक या मुख्य ८० फुटी रस्त्यावर गेल्या महिन्यात सिमेंटचे रस्ते बनविले होते. या ठेकेदाराने बनविलेले रस्ते चक्क एक महिन्यात खराब झाले असल्याचे दिसून आल्यानंतर ‘जळगाव मिरर’ ने दि.१ एप्रिल रोजी  याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर लागलीच दुसऱ्यादिवशी अधिकाऱ्यांनी पाहणी करीत ठेकेदाराला दम भरला होता त्यानंतर या रस्त्याला तात्पुरत्या स्वरूपात ‘मलम’ लावण्यात आला आहे.

जळगाव शहरातील प्रभाग क्र.१ दुध फेडरेशन परिसरातील नवीन उड्डाणपुलाजवळील सुरेश कलेक्शन ते मारोती चौकच्या ८० फुटी रस्ता ठेकेदाराने फेब्रुवारी – मार्च महिन्यात सिमेंटचा बनविला होता. मात्र मार्च महिन्याच्या अखेरीस हा रस्ता सिमेंट बाहेर येवून रस्त्ता खराब झाला होता. यावर सातत्याने परिसरातील नागरिकांनी अधिकाऱ्यांना तक्रारी करून देखील रस्त्याचे काम उत्तर दर्जाचे होत नव्हते तर दुसरीकडे रस्त्याला तळे जावून काही ठिकाणी खराब देखील झाला होता. यावर ‘जळगाव मिरर’ ने वृत्त प्रकाशीत करून अधिकाऱ्यांच्या कानउघडणी केल्यानंतर मनपाचे अधिकारी रंधे यांनी पाहणी करून ठेकेदाराला फुसका दम भरला व त्यानंतर ठेकेदाराने केवळ ‘मलम’ लावून नागरिकांना तूर्त दिलासा दिला आहे.

जळगाव मनपातील अधिकाऱ्यांना सरकार पगार देत असते, मात्र याच मनपातील काही निवळक अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करून ठेकेदारांचे गुलाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. या अधिकारयांचा ठेकेदारावर जो धाक असायला हवा तो कदापि दिसून येत नाही. तर ठेकेदाराला ‘साहेब साहेब, म्हणून बोलून दर्जा देत असल्याने हे अधिकारी ठेकेदाराचे गुलाम  झाल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.