रात्रीच्या सुमारास तरुणाला मारहाण करीत रोकड लांबविली !

रस्त्याने पायी जात असलेल्या शहरातील ४० वर्षीय तरुणाला अज्ञात दोघांनी मारहाण करत त्याच्या खिशातील दोन हजारांची रोकड व १४ हजाराचा मोबाईल लांबवल्याचा प्रकार २५ मार्चला रात्री ११ वाजता घोडेपीरबाबा दर्याजवळ घडला होता. याप्रकरणी अज्ञात दोघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिरपूर कन्हाळा रोडवर मनोज रामचरण शर्मा (वय ४०) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. २५ मार्चला रात्री ११ वाजेच्या सुमारास मनोज शर्मा हे शहरातील नाहाटा चौफुली येथून घरी पायी जात होते. दरम्यान, घोडेपीर बाबा दर्गाजवळ अज्ञात दोघांनी त्यांना अडवून मारहाण करत त्यांच्या खिशातील १४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि दोन हजारांची रुपयांची रोकड लुटून नेली.

या प्रकरणी मनोज शर्मा यांनी २ एप्रिलला रात्री १०.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यत आला. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश कोळी करत आहे. दरम्यान, संशयितांचा कसून शोध सुरू आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.