सकाळी खरेदीसाठी गेले, संध्याकाळी नवरदेवाचं टोकाचं पाऊल; लग्नाच्या १२ दिवस आधी काय घडलं? कुटुंबावर शोककळा.

जालन्यात तरुण शेतकऱ्याने लग्नाच्या १२ दिवस आधी टोकाचं पाऊल उचलल्याने दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.जालन्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंबड तालुक्यातील डोमेगाव या गावातील अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. डोमेगाव या गावातील राम पांडुरंग धाईत, २७ वर्ष, या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये झाडाला गळफास घेतला आहे. त्याचं काही दिवसांवर लग्न येऊन ठेपलं होतं. घरात लग्नाची तयारी सुरू होती. पण तरुणाच्या मनात नेमकं काय सुरू आहे, याची कोणालाही कल्पना नव्हती. कुटुंबात लग्न होणार असल्याचा आनंद असताना दुसरीकडे मात्र लग्नाच्या काही दिवस आधी तरुणाने आयुष्य संपवलं.अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील राम पांडुरंग येथे शेतकरी कुटुंबातील तरुणाने बीएपर्यंत शिक्षण घेतलं होतं. नुकतंच त्याचं लग्न जमलं होतं. मंठा तालुक्यातील तळणी येथील एका मुलीशी मंगळवारी, १५ एप्रिल रोजी त्याचं लग्नसोहळा पार पडणार होता. दोन्ही कुटुंब लग्नाच्या तयारीमध्ये होते.

लग्नाच्या खरेदीसाठी तरुणाच्या घरचे कुटुंबीय आणि नवरीकडील कुटुंब अशी दोन्हीकडील मंडळी जालना येथील एका दुकानामध्ये लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आले होते. दोन्ही कुटुंबांनी लग्नाची खरेदी केली आणि आपापल्या घरी परतले. खरेदीवेळी रामदेखील उपस्थित होता.राम आणि त्याचे कुटुंबीय खरेदी करुन सायंकाळी आपल्या गावी डोमेगाव येथे परतले. घरी आल्यानंतर संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास रामने बाहेर चक्कर मारुन येतो असं सांगितलं आणि तो घराबाहेर पडला. संध्याकाळी बाहेर पडलेला राम बराच वेळ झाला तरी घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या भावाने त्याला अनेक कॉल केले. फोनची रिंग वाजत होती, पण राम काही फोन उचलत नव्हता.

त्यामुळे त्यांनी आजूबाजूला त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच्या जवळच्या मित्रांना फोन करुन विचारलं असता त्यांच्याकडेही रामचा पत्ता लागला नाही.अखेर कुटुंबातील एका व्यक्तीने गावाजवळच असलेल्या गट नंबर १७३ मधील शेतात जाऊन पाहिलं. तिथे एका लिंबाच्या झाडाला राम दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेने कुटुंबीयांच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि रामला ग्रामस्थ आणि नातलगांच्या मदतीने अंबड येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल केलं. तपासणी करुन डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. लग्न अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेवलं असताना रामने आत्महत्येचं टोकाचं पाऊल का उचललं असं प्रश्न उपस्थित झाला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.