दोन शालेय विद्यार्थीनींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू, नागरिकांचा संताप; परिसरात खळबळ.

शहरातील झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळे दोन विद्यार्थींनींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.सोलापूर शहराच्या मधोमध असलेल्या मोदी परिसरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टी येथे दोन शालेय विद्यार्थनींचा अचानक मृत्यू झाला आहे. भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत महापालिकेला याप्रकरणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या भागात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती या भागातील नागरिक देत आहेत. तसंच दूषित पाण्याने दोन मुलींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.भाग्यश्री म्हेत्रे (१६), जिया महादेव म्हेत्रे (१६) ही मृत मुलींची नावं आहेत. तर जयश्री महादेव म्हेत्रे (१८) या तरुणीची प्रकृती गंभीर आहे. या मुलीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

आमदार देवेंद्र कोठे आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.बाबू जगजीवन राम झोपडपट्टी मधील मृत्यू झालेल्या या विद्यार्थीनी, इयत्ता नववीमध्ये शिकत असल्याची प्राथमिक माहिती आहे. आणखी दोन विद्यार्थी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्यासह त्या भागामध्ये भेट दिली असताना नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात बऱ्याच तक्रारी मांडल्या.

यावेळी आमदार कोठे यांनी महापालिका आयुक्तांना फोन लावून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.मागील अनेक दिवसांपासून सोलापूर शहरासह बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडूनही दूषित पाणीपुरवठा होत असल्याची खातरजमा करण्यात आली आहे. परिसरात दूषित पाणी येत असून त्या पाण्याचा रंगही बदललेला आहे. दूषित पाण्यामुळे दोन मुलींच्या मृत्यूची घटना घडल्याने सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.