स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या चर्चेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत सादर केल्यामुळं तो वादात सापडला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या विकसित भारत या उपक्रमावरील विडंबन कवितांमुळं स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबई पोलिस कुणाल कामरावर कारवाई करत आहेत. प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहावे, यासाठी खार पोलिसांनी कामराला समन्स बजावले आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे जबाबही नोंदविले जात आहेत. दरम्यान, या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.ऑनलाइन तिकीट विक्री साठी लोकप्रिय असलेल्या बुक माय शो या प्लॅटफॉर्मवरून कुणाल कामराची सर्व माहिती डिलिट करण्यात आली आहे.










