मुंबईकरांनो, मध्य, ट्रान्स हार्बरवर उद्या ब्लॉक; पश्चिम रेल्वेची काय स्थिती? कोणत्या लोकल रद्द.

ब्लॉक वेळेत रेल्वेरुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी / नेरूळदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते राम मंदिरदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. ब्लॉक वेळेत रेल्वेरुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.ठाणे ते पनवेल/वाशी/नेरुळदरम्यान धावणाऱ्या ट्रान्स-हार्बरवरील अप आणि डाउन लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक असणार नाही. यामुळे वेळापत्रकाप्रमाणे हार्बरवर लोकल धावणार आहेत.

ब्लॉक वेळेत अप-डाउन जलद मार्गावरील लोकल अप-डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. फलाटाच्या अनुपलब्धतेमुळे राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द राहणार असून काही लोकल विलंबाने धावणार आहे. रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.