भाविकांसाठी आनंदाची बातमी! चैत्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंग गडासाठी दर १५ मिनिटांनी बस, कसं असेल नियोजन.

नाशिक-सप्तशृंग गड मार्गावर दर १५ मिनिटांनी बस सुटणार असल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली.कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर चैत्र पौर्णिमेची यात्रा असून भाविकांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एकूण अडीचशे बसेस या मार्गावर धावणार आहेत. नाशिक-सप्तशृंग गड मार्गावर दर १५ मिनिटांनी बस सुटणार असल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली.सप्तशृंग गड येथे दरवर्षी नवरात्राची यात्रा भरते.

या यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने पुरेशा संख्येने बससेवा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार दि. ५ ते १३ एप्रिल या कालावधीत या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.नाशिक, मालेगाव, मनमाड, सटाणा, नांदगाव येथून सप्तश्रृंग गडासाठी बसेस सुटणार आहेत. याशिवाय नांदुरी ते सप्तशृंगी गड या मार्गावर सर्वाधिक १२० बसेस धावणार आहेत.

सप्तशृंगी गड ते नाशिक मार्गावर ६५, मालेगाव मार्गावर ४५, मनमाड मार्गावर १५ तर सटाणा मार्गावर पाच बसेस धावणार आहेत. नांदुरी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी प्रत्येक पाच मिनिटाला एक बस सुटणार आहे. तर, नाशिकहून दर १५ मिनिटांनी सप्तशृंग गडाकडे बस सोडण्यात येणार आहेत. याशिवाय ई-बसद्वारे दिवसभरात ३६ फेऱ्या होणार असल्याची माहिती महामंडळातील अधिकृत सूत्रांनी दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.