कर्जमाफीच्या पैशांचं काय करता? साखरपुडा, लग्न…अवकाळी नुकसानीच्या पाहाणीवेळी कृषीमंत्र्यांचा शेतकऱ्यांना सवाल.

नाशिमध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांची पाहाणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पैशांचं काय करता असा सवाल केला.राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून अवकाळीमुळे राज्यातील विविध भागात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसान झालेल्या पिकांची पाहाणी करण्यासाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे नाशिकमधील माडसांगवी आले होते. या पाहाणीवेळी त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यांवरुन शेतकऱ्यांनी सुनावलं. कर्जमाफी मिळाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशांचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित शेतऱ्यांना केला.शुक्रवारी सायंकाळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिकमधील माडसांगवी या गावी आले होते. गावात अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी ते माडसांगवी या गावात आले होते.

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहाणी करताना कृषीमंत्र्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. पाहाणीदरम्यान, तिथे एका शेतकऱ्याने कोकाटे यांना कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर उत्तर देताना कोकाटे यांनी शेतकऱ्यालाच उलट कर्जमाफीच्या पैशांचं काय करता असा सवाल केला आहे. त्यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.’कर्जमाफी मिळाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशांचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक आहे का एक रुपयाची तरी? सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार आता तुम्हाला. शेतकरी ५ ते १० वर्ष वाट पाहतात, तोपर्यंत कर्ज भरतचं नाही. सरकार सिंचनासाठी, पाईपलाइनसाठी पैसे, पिकासाठी पैसे, शेततळ्याला पैसे देणार आहे. भांडवली गुंतवणूक सरकार करतं, शेतकरी करतो का?

शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे हवेत, ह्याचे-त्याचे पैसे हवेत, मग साखरपुडे करा, लग्न करा.’दरम्यान, नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. द्राक्ष बागा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाने मोठं संकट आलं आहे. असं असतानाही कृषीमंत्र्यांनी शेतऱ्यांना केलेल्या या सवालावर आता मोठी टीका होत आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधत सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला आहे. तसंच सरकार आणि कृषीमंत्री सत्तेच्या मस्तीत वावरत असल्याचं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.