गगनयात्री मे महिन्यात अवकाशात झेपावणार? ‘अ‍ॅक्सिऑम ४’ मोहिमेतून शुभांशू शुक्ला घेणार भरारी.

गगनयान मोहिमेसाठी निवड झालेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचा समावेश असलेल्या ‘ॲक्सिऑम ४’ या मोहिमेचे मे महिन्यात प्रक्षेपण होऊ शकते.भारताच्या गगनयान मोहिमेसाठी निवड झालेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचा समावेश असलेल्या ‘ॲक्सिऑम ४’ या मोहिमेचे मे महिन्यात प्रक्षेपण होऊ शकते. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाणारे शुक्ला हे पहिले भारतीय नागरिक ठरतील. अमेरिकी अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने याबाबत नुकतीच माहिती दिली.गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शुक्ला आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर या गगनयात्रींची अवकाश मोहिमेसाठी अधिकृत निवड झाली होती. मोहिमेत शुक्ला यांच्याकडे कॅप्टनची जबाबदारी आहे.

विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल चार दशकांनी भारतीय नागरिकत्व असणारी व्यक्ती अवकाश प्रवास करील. शुक्ला यांच्यासोबत अमेरिकेच्या पेगी व्हिट्सन या कमांडर असतील.जून २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ आणि अमेरिकी अवकाश संशोधन संस्था- ‘नासा’च्या संयुक्त अवकाश मोहिमेची घोषणा करण्यात आली होती. त्याला अनुसरून नासाशी व्यावसायिकरीत्या संलग्न असलेल्या ‘अॅक्सिओम स्पेस’ या कंपनीसोबत ‘इस्रो’च्या ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटरने (एचएसएफसी) या मोहिमेसाठी अवकाश प्रवासाचा करार केला होता.

■ ‘स्पेस एक्स’ कंपनीच्या ‘फाल्कन ९’ रॉकेटच्या साह्याने क्रू ड्रॅगन अवकाश यानामार्फत ही मोहीम पार पडेल. ■ ही मोहीम १४ दिवसांची असेल ■ मोहिमेत अंतराळवीर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात विविध वैज्ञानिक प्रयोग करणार आहेत.
■ तंत्रज्ञानांची तपासणी आणि अवकाश तंत्रज्ञानाचा सर्वसामान्यांमध्ये प्रसारही करतील.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.