ताजमहालमुळे ASI मालामाल; ५ वर्षांत तिकीटविक्रीतून सर्वाधिक कमाई, जाणून घ्या दुसऱ्या क्रमांकावर कोण.

 भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित केलेल्या वास्तूंपैकी ताजमहालने पाच वर्षांत तिकीटविक्रीतून सर्वाधिक महसूल दिला आहे.मुघलकालीन स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण असलेल्या ताजमहालकडे देश-विदेशातील पर्यटकांचा कायमच ओढा असतो. देशभरातील वारसास्थळांचा विचार केला, तर ताजमहाल हा पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचा ठरला आहे.भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित केलेल्या वास्तूंपैकी ताजमहालने पाच वर्षांत तिकीटविक्रीतून सर्वाधिक महसूल दिला आहे. या कालावधीत एकूण २९७कोटी रुपयांचा महसूल जमा झाला, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिकमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.भारतीय पुरातत्त्व विभागाला (एएसआय) गेल्या पाच वर्षांत विविध वारसास्थळांच्या प्रवेश तिकीटविक्रीतून किती रुपयांचा महसूल प्राप्त झाला.

वर्षानुसार आणि स्थळांनुसार त्याचा तपशील द्यावा आणि या कालावधीत सर्वाधिक महसूल कोणत्या वारसास्थळाला मिळाला, असा प्रश्न राज्यसभेत विचारण्यात आला. याच्या उत्तरादाखल मंत्र्यांनी सन २०१९-२० ते २०२३-२४ या पाच आर्थिक वर्षातील तपशील दिला.■ गेल्या पाच वर्षांचा विचार केल्यास, ताजमहालने तिकीटविक्रीतून सर्वाधिक महसूल मिळवला■आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये आरयाचा किल्ला आणि कुतुबमिनार अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी

■ २०२०-२०२१मध्ये तमिळनाडूमधील महाबलिपुरम दुसऱ्या आणि कोणार्क येथील सूर्यमंदिर तिसऱ्या क्रमांकावर होते
■ आर्थिक वर्ष २०२३-२४मध्ये कुतुबमिनार दुसऱ्या आणि लाल किल्ला तिसऱ्या स्थानी होता.आर्थिक वर्ष २३-२४मध्ये महसुलात ताजमहालनंतर कुतुबमिनारचा क्रमांक. २३.८०,१६,९८३ रुपयाचा महसूल जमा झाला.
तिसऱ्या क्रमांकावर दिल्लीतील लाल किल्ला आहे. येथून १८,०८,९०,८२५ रुपयांचा महसूल जमा झाला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.