उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. मराठी भाषेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या परवानगीनंतरच ही भेट घेतल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उदय सामंत म्हणाले की, मराठीच्या मुद्दयाबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार आहे.आज सकाळी उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलीये. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये भेट झालीये. या भेटीबद्दल बोलताना उदय सामंत म्हणाले की, मी एकनाथ शिंदे यांची परवानगी घेऊन आलो होतो. मराठीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करीन मराठी बाबत. मराठी भाषिकावर काही ठिकाणी अन्याय होतो, यावर राज ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे. काही दिवसांपूर्वीही उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते.
उदय सामंत हे पुढे बोलताना म्हणाले की, बाकीच्या भाषेचा सन्मान आम्ही करतो, तसा आपल्या भाषेचा देखील व्हावा ही राज ठाकरेंची भूमिका आहे आणि आमची देखील. राज्यातील बँकांचे व्यवहार मराठीत झाले पाहिजे. यासाठी सर्व समित्याची बैठक घेईन आणि काय कारवाई करता येतील याबाबत निर्णय घेऊ. राज्यातील बँकांमधील व्यवहार हे जास्तीत जास्त मराठीतच झाले पाहिजे, ही मनसेही भूमिका आहे. या मुद्दावरूनच उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते.राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्यात साधारणपणे तासभर चर्चा झाली. सुरूवातीला चर्चा होती की, राज्यातील आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असावी. मात्र, त्यानंतर उदय सामंत यांनी भेटीचा विषय नेमका काय होता, हे स्पष्ट केले. फक्त हेच नाही तर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवानगी घेऊनच आपण इथे आल्याचेही म्हटले.









