भारदस्त आवाजाची देणगी लाभलेला उत्कृष्ट अभिनेता मराठी सिनेइंडस्ट्रीनं गमावला.

चार दिवस सासूचे, दामिनी आणि वादळवाट सारख्या टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे लोकप्रिय अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं निधन झालं आहे.मुंबई: मूळ नागपूरकर आणि मराठी नाट्य, दूरचित्रवाणी व चित्रपट अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं शुक्रवारी दुपारी मुंबई इथं निधन झालं. आज शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. उजवणे यांच्या पश्चात पत्नी अंजली आणि मुलगा कपिल आहे. डॉ. उजवणे यांनी बोरिवली येथील ओम हॉस्पिटल इथं अखेरचा श्वास घेतला.भारदस्त आवाजाची देणगी लाभलेला उत्कृष्ट अभिनेता म्हणून डॉ. उजवणे यांनी आपली ओळख निर्माण केली होती. ‘वादळवाट’ या गाजलेल्या मालिकेसह अनेक नाटके, दूरचित्रवाणीच्या मालिका आणि विविध चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका केल्या होत्या.

डॉ. विलास उजवणे यांनी ‘चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’, ‘वादळवाट’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधील भूमिकांतून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.गेली काही वर्षे विलास उजवणे यांची अनेक आजारांशी झुंज सुरू होती. वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता, ज्यामुळं त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला.सहा वर्षांपासून त्यांनी ब्रेन स्ट्रोकशी झुंज दिली या आजाराशी दोन हात करता करता त्यांची संपूर्ण जमा पूंजी खर्च झाली होती. त्यातच त्यांना हृदयाचा त्रासही सुरु झाला होता. या सर्व गोष्टींना विलास तोंड देत असतानाच दोन वर्षांपूर्वी त्यांना कावीळ झाली होती. या काळात त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. त्यांचं तात्काळ ऑपरेशन करणं गरजेचं होतं, उपचारांसाठी विलास यांना आर्थिक मदतीची गरज असल्याचं समोर आली होती.

इतकं होऊनही त्यांच्यात जगण्याची एक जिद्द होती. या आजारपणातून सावरत असतानाच, त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला अन् त्यांची प्राणज्योत मालवली.विलास यांचे मित्र राजू कुलकर्णी यांनी दोन वर्षांपूर्वी शेअर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. ‘हा राजा माणूस म्हणजे आमचा लाडका डॉक्टर मोठ्या अडचणीत सापडला आहे. गेली सहा वर्ष ब्रेन स्ट्रोकशी झुंज देणाऱ्या हा वाघ थोडा थकला आहे. अत्यंत साध्या सदनिकेत राहणारा हा कलाकार आपल्या आयुष्याची सर्व पुंजी या आजारांमध्ये खर्च करून बसला आणि ती रक्कम थोडी थोडकी नाही. चांगली सुधारणा होत आहे असं वाटत होचं, बाहेर पडत होता, कुठे परीक्षक तर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून चाहत्यांना दिलासा देत होते. लवकरच आपली सेकंड इनिंग चालू करणार असं वाटत असताना नियती त्यांच्या पुढे दोन मोठ्या आजारांचे निष्ठुर दान टाकून निघून गेली.’

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.