‘शिंदे गटातील सर्व लोक जनाब मोदी आणि जनाब शहा यांचे चेले, डरपोक लोकांनी मर्दांसोबत…’, संजय राऊतांचा निशाणा.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करत त्यांचा उल्लेख जवाब असा केला आहे. तसंच ट्रेड वॉरदरम्यान पंतप्रधानांच्या बँकॉक टूरवरुनही त्यांनी निशाणा साधला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटासह, अमित शहा, पंतप्रधानांवर टीका केली आहे. वफ्क विधेयकावरुन उद्धव ठाकरे यांना जनाब उद्धव ठाकरे असं बोललं जात आहे, असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, की शिदें गटाचे लोक शिकलेले नाही. शिंदे गटातील लोक वाचत नाही, ऐकत नाही. माझं भाषण ऐकावं, मी संसदेत बोललो आहे. जनाब उद्धव ठाकरे नाही, तर अमित शहा आहेत. अमित मियाँ शहा, नरेंद्र मियाँ मोदी हे खरे जनाब आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांवर निशाणा साधत टीका केली.पुढे बोलताना ते म्हणाले, ‘गरीब मुसलमानांची एवढी काळजी… बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना यांनीही एवढी चिंता त्यावेळी केली नव्हती, ज्यावेळी पाकिस्तान बनत होता. आम्हीच मुसलमानांचे मसिहा आहोत, अशी चिंता हे आता करत आहेत.

बॅरिस्टर जिन्ना यांचा आत्मा कबरीतून बाहेर येत मोदी आणि शहा यांच्यात घुसला असं मला वाटलं. हे लोक आम्हाला जनाब बोलतात. शिंदे गटातील सर्व लोक जनाब मोदी आणि जनाब शहा यांचे चेले आहेत. सगळे घाबरुन जगत आहेत. काही केलं तर ईडीच्या केसमध्ये अडकवून जेलमध्ये टाकतील, अशी भीती आहे. अजून त्यांच्या फाईल बंद झालेल्या नाहीत. या डरपोक लोकांनी मर्दांसोबत बोलू नये’, असं म्हणत राऊतांनी शिंदेंसह त्यांच्या गटात गेलेल्या सर्व नेत्यांवर टीका केली आहे.ट्रेड वॉर सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी यावर कोणतंही विधान केलेलं नाही. या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘सध्या मोदी बँकॉकमध्ये आहेत.

त्यांच्या ब्रेनचा मसाज होतो आहे. तिथे जाऊन लोकांना फ्रेश वाटतं. मोदीजी बँकॉक टूरवर आहेत. ट्रेड वॉर सुरू आहे. २६ टक्के टेरिफ लावण्यात आला आहे. इथला उद्योग, शेअर बाजार, इथला रुपया घसरला असून तो आता मेला आहे. पण मोदीजी बँकॉकमध्ये आहेत. बँकॉकमध्ये एवढं कसलं संकट कोसळलं आहे, जे तिथे गेले आहेत. ते बँकॉकमधून ट्विट करत आहेत. ते ट्विटर पंतप्रधान आहेत. त्यांचा सोशल मीडिया हा वेगळा देश आहे.’, असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.