पावसाचे थैमान सुरूच, हवामान खात्याकडून मोठा इशारा, आज…

 राज्यात हवामानात मोठा बदल होत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याकडून आजही येलो अलर्ट हा जारी करण्यात आलाय. मराठवाड्याला या अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसतोय. हवामानात मोठा बदल होताना दिसतोय. सातत्याने राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळीच्या सरी बरसताना दिसत आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झालाय. मराठवाड्यामध्ये तर अवकाळीचा मोठा फटका बसल्याचे बघायला मिळतंय. अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगर जिल्हात देखील वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. होळीनंतर पारा वाढणार असल्याचे चित्र असताना दुसरीकडे जोरदार पाऊस होताना दिसतोय.गुरुवारी अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. नाशिकमध्येही पाऊस झाला असून फळ बागांचे मोठे नुकसान झालंय.

कालच हवामान खात्याकडून अनेक भागांमध्ये पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट हा देण्यात आला होता. आजही हवामान खात्याकडून अलर्ट देण्यात आलाय. राज्यावरील अवकाळीचे ढग काही जाताना दिसत नाहीयेत. सध्या पावसासाठी पोषक वातवरण निर्माण झालंय.मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात आजही हवामान खात्याकडून जारी करण्यात आलाय. आज देखील वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. यासोबतच काही भागांमध्ये गारपिटीचा देखील इशारा देण्यात आलाय. सध्या चक्राकर वारे वाहत आहे. यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बाष्प वाऱ्यामुळे संगम होत आहे.

मुंबईतही सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याचे बघायला मिळतंय.आजही अनेक भागांमध्ये अवकाळीचा फटका बसणार असल्याचे चित्र आहे. गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान होताना दिसतंय. काल ब्रह्यपुरीत सर्वाधिक तापमानाची नोंद झालीये. ३८.८ अंश सेल्सिअस तापमान होते. चंद्रपूर, धुळे, मालेगाव आणि सोलापूरमध्ये ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अवकाळी पाऊस जरी पडत असेल तरीही ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढल्याचे बघायला मिळतंय. पुण्यातही ढगाळ वातावरण असण्याचा अंदाज आहे. नाशिकमध्ये काल मोठ्या प्रमाणात गारपिट झाली. होळीच्या अगोदर उष्णतेच्या लाटेचा हवामान खात्याकडून दोनदा इशारा देण्यात आला होता.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.