लाइक, सबस्क्राइब अन् ६१ लाखांचा फटका; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सायबर फसवणूक, घरबसल्या कमाईच्या बहाण्याने लुबाडले.

एका लाइकसाठी १५० रुपये प्रमाणे ११ हजार रु. मिळाल्याने विश्वासाने ‘पेड टास्क’मध्ये लाखोंची गुंतवणूक करण्यात आली. मात्र, पैसे परत देताना वेगवेगळी कारणे पुढे करून चालढकल केली जाऊ लागली.लाइक आणि सबस्क्राइब करून हजारो रुपये घरबसल्या कमावता येत असतील तर… एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने ‘हसत हसत’ ते काम स्वीकारले. एका लाइकसाठी १५० रुपये प्रमाणे ११ हजार रु. मिळाल्याने विश्वासाने ‘पेड टास्क’मध्ये लाखोंची गुंतवणूक करण्यात आली. मात्र, पैसे परत देताना वेगवेगळी कारणे पुढे करून चालढकल केली जाऊ लागली. ही सायबर फसवणूक आहे, हे लक्षात येईपर्यंत या अभिनेत्याने ६१ लाख रु. गमावले होते.उत्तर विभाग सायबर पोलिस ठाण्यात संबंधित अभिनेत्याने दिलेल्या तक्रारीनुसार, फेब्रुवारीमध्ये अनोळखी व्हॉट्सॲप क्रमांकावरून एका महिलेने संपर्क साधला. आम्ही टेलिग्राम आणि अन्य समाजमाध्यमांवर पाठवू, त्या इन्स्टाग्राम लिंकना फक्त लाइक करायचे आहे. प्रत्येक लाइकला दीडशे रुपये दिले जातील.

अशा प्रकारे घरबसल्या हजारो रुपये कमावता येतील, असे सांगितले. अभिनेत्याने लगेच होकार देत काम सुरू केले. सुरुवातीला ११ हजार रुपये मिळाल्याने अभिनेत्याचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला. अतिरिक्त ३० टक्के कमिशन आणि लाइक केल्याचा मोबदला वेगळा हवा असल्यास गुंतवणूक करावी लागेल व यापुढे सर्व टास्क हे पेड असतील, अशी माहिती देण्यात आली.अभिनेत्याने सुरुवातीला किरकोळ रक्कम गुंतवली. त्यावरील मोबदला ई वॉलेटवर जमा झाल्याचा दिसला. त्यामुळे अभिनेत्याने सुमारे २७ लाख रुपये गुंतवले.

शहानिशा करण्यासाठी वॉलेटवर जमा रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता, तुमचा टास्क ८० टक्के पूर्ण झाला असून, तो १०० टक्के होईल, तेव्हाच तुम्हाला रक्कम काढता येईल, असे सांगण्यात आले. यासाठी अभिनेत्याकडून आणखी १९ लाख रु. घेण्यात आले. त्यानंतर ३० टक्के करही भरला. अशाप्रकारे अभिनेत्याने तब्बल ६१ लाख ८३ हजार रुपये भरले. ३० टक्के कर चुकीच्या खात्यामध्ये भरल्याचे सांगत अभिनेत्याकडे आणखी रक्कम मागण्यात आल्याने त्याला संशय आला. याबाबत परिचयातील व्यक्तीकडे विचारणा केल्यावर ही सायबर फसवणूक असल्याचे लक्षात आले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.